News Flash

या भारतीय क्रिकेटर्सची पसंती विवाहित तरुणींना

खेळाडूंच्या पत्नी स्टेडियममध्ये आपल्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी येतात

क्रिकेटर्सच्या लव्ह स्टोरीबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायची इच्छा असते. मग ती विराट- अनुष्काची लव्ह स्टोरी असतो किंवा अजिंक्य राहाणे आणि राधिकाची. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला त्यांच्या आवडत्या खेळाडूची लव्ह स्टोरी नक्की काय असेल याची माहिती हवी असते. सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या पत्नी स्टेडियममध्ये आपल्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी येतात. आज आम्ही तुम्हाला अशा क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी विवाहित तरुणींना आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवले आहे.

शिखर धवन- टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवनने २०१२ मध्ये आएशा मुखर्जीशी लग्न केले. आएशाला पहिल्या लग्नाच्या दोन मुली आहेत. शिखर आणि तिची ओळख फेसबुकमार्फत झाली. यानंतर हरभजन सिंगमार्फत या दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आएशा ऑस्ट्रेलियामध्ये राहते. शिखरला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो पत्नी आणि मुलांना भेटायला मेलबर्नला जातो.

अनिल कुंबळे- भारतीय क्रिकेट टीमचा माजी स्पिन गोलंदाज अनिल कुंबळेने चेतनाशी विवाह केला. चेतनाने १९९९ मध्ये तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. चेतनाला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. लग्नानंतर कुंबळेने मुलीचाही स्वीकार केला. १९९० ते २००८ पर्यंत कुंबळे त्याच्या करिअरमध्ये १३२ कसोटी सामने आणि २७१ एकदिवसीय सामने खेळला. जगात कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे तर भारतात तो अव्वल स्थानावर आहे.

मुरली विजय- टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज मुरली विजयने त्याचाच साथीदार दिनेश कार्तिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीशी २०१२ मध्ये लग्न केले. निकिताला तेव्हा एक लहान मुलगाही होता. २०१२ मध्ये निकिता आणि मुरलीमध्ये जवळीक वाढत चालल्याचे दिनेश कार्तिकलाही कळले. अखेर दिनेशने निकिताला घटस्फोट दिला आणि निकिताने मुरली विजयशी लग्न केले.

जवागल श्रीनाथ- भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने १३ डिसेंबर २००७ मध्ये माधवी पात्रावलीशी विवाह केला. माधवी ही व्यवसायाने पत्रकार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2018 4:55 pm

Web Title: these indian cricketers had marry married women shikhar dhawan anil kumble murli vijay javagal srinath
Next Stories
1 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : नदालचा संघर्षपूर्ण विजय
2 वोझ्नियाकी उपांत्यपूर्व फेरीत
3 वडिलांच्या प्रेरणेमुळे अपयशावर मात करू शकले!
Just Now!
X