08 April 2020

News Flash

बेन स्टोक्सच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर इंग्लडचा ऑस्ट्रेलियावर विजय

तिसऱ्या कसोटीत इंग्लडच्या विजयामुळे मालिकेत १-१ ची बरोबरी

इंग्लडने बेन स्टोक्सच्या नाबाद शतकी (१३५ रन) खेळीच्या बळावर अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एक गडी राखून ऑस्ट्रेलियावर ऐतिहासीक विजय मिळवला आहे. तत्पूर्वी हा सामना रंगतदार अवस्थेत आला होता.

या सामान्यात ऑस्ट्रेलिया विजयी होईल असे सुरूवातीला सर्वानाच वाटत होते. कारण,ऑस्ट्रेलिया दिलेल्या ३५९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे २ फलंदाज अवघ्या १५ धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर कर्णधार जो रुट (७७) आणि जो डेन्ली (५०) यांनी संघाचा डाव सावरला. मात्र, हे दोघे तंबूत परतल्यानंतर बेन स्टोक्सने एकाकी झुंज देत १३५ धावा केल्या आणि इंग्लडला एक विकेट राखून ऐतिहासीक विजय मिळवून दिला. इंग्लडने हे लक्ष्य ९ गडी गमावून साध्य केले.

इंग्लडचा शेवचा खेळाडू लीचने स्टोक्सला अगदी चिवटपणे उत्तम साथ दिली. तो ९ बाद २८६ धावा असताना मैदानात उतरला व त्यानंतर शेवटपर्यंत विकेटवर अडून राहिला. त्याने १७ चेंडूत १ धावा केली. विशेष म्हणजे या जोडगळीने ७६ धावांची भागीदारी केली, ज्यात लीचच्या केवळ एकाच मात्र महत्वपूर्ण धावेचे योगदान आहे.

बेन स्टोकने २१९ चेंडूतील आपल्या  १३५ धावांच्या वादळी खेळीत ११ चौकार व तब्बल ८ षटकार लगावले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत १- १ अशी बरोबरी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2019 9:25 pm

Web Title: third test england beat australia by 1 wicket msr 87
Next Stories
1 जगज्जेती सिंधू! नोझोमी ओकुहाराचा धुव्वा उडवत जिंकली वर्ल्ड चॅंपियनशिप
2 Viral Video : ‘कॅप्टन कूल’ धोनी जेव्हा हाती बासरी घेतो…
3 Ind vs WI : विंडीजचा निम्मा संघ गारद करत इशांतची हरभजन-कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी
Just Now!
X