06 August 2020

News Flash

Women’s T20 World Cup : तिसरे पंच देणार नो-बॉलचा निर्णय

ICC जनरल मॅनेजर जेफ अल्ड्राइस यांनी दिली माहिती

२१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात महिलांच्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने नियमांमध्ये मोठा बदल करत, नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर दिलेली आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध विंडीज मालिकेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा वापर केला होता, यानंतर आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. २१ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

मैदानाबाहेरील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याशिवाय मैदानावरील पंचांनी नो-बॉलचा निर्णय देऊ नये अशा सूचनाही आयसीसीने पंचांना दिलेल्या आहेत. विश्वचषकासारख्या स्पर्धेत निर्णय देताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याकरता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ अल्ड्राइस यांनी दिली. मध्यंतरी आयपीएल आणि काही कसोटी सामन्यांमध्ये मैदानावरील पंच नो-बॉलचे निर्णय अचूक देण्यात अपयशी ठरले होते. यानंतर आयसीसीने यावर काही तोडगा काढण्याची मागणी केली जात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:44 pm

Web Title: third umpire to call no balls in womens t20 world cup psd 91
Next Stories
1 Ind vs NZ : अय्यरची ही कामगिरी पाहून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल
2 Ind vs NZ : श्रेयस अय्यर चमकला, धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
3 Ind vs NZ : सलग तिसऱ्या सामन्यात विराट अपयशी
Just Now!
X