27 September 2020

News Flash

सचिनचं कसोटी संघात पदार्पण; २९ वर्ष जुन्या आठवणींमध्ये रमला क्रिकेटचा देव

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात केलं होतं पदार्पण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना आपल्या पायदळी तुडवून जगभरातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या मनात घर करणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खास आहे. बरोबर २९ वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आज या आठवणींना सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उजाळा दिला आहे. वयाच्या १६ व्या वर्षी सचिनने १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं.

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सचिनने पहिल्या डावात फक्त १५ धावा काढल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानच्या वकार युनूसने सचिनला बाद केलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे वकार युनूसचाही तो पदार्पणाचाच सामना ठरला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ पेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीनंतर सचिनने अखेर निवृत्ती घेतली. योगायोगाची गोष्ट म्हणजे २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर याच दिवशी सचिनने विंडीजविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. या कसोटीत सचिनने ७४ धावा केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 1:06 pm

Web Title: this day that year sachin tendulkar makes his test debut against pakistan
Next Stories
1 ब्रॉडनेच इंग्लंडला करुन दिली युवीच्या सहा षटकारांची आठवण
2 चाहत्यासाठी काहीपण! गाडी थांबवून धोनीने घेतली छोट्या फॅनची भेट
3 आयपीएलमध्ये सहभागी व्हायचंय तर या अटी मान्य करा; क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खेळाडूंना ताकीद
Just Now!
X