न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम षटकात मोक्याच्या क्षणी एक धाव न काढल्यामुळे दिनेश कार्तिक टीकेचा धनी बनला होता. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा टी-20 मालिका जिंकण्याची संधीही भारतीय संघाने गमावली. मात्र सध्याचा भारतीय संघ पराभवाच्या मानसिकतेमधून लगेच सावरु शकतो असं वक्तव्य दिनेश कार्तिक याने केलं आहे. तो हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राशी बोलत होता.

अवश्य वाचा – इराणी करंडक : सलग दुसऱ्या डावात हनुमा विहारीचं शतक, शेष भारताचा डाव सावरला

न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिकेत प्रत्येक सामन्यात आम्ही चुकांमधून शिकत गेलो. पहिल्या टी-20 सामन्यात आम्ही न्यूझीलंडला खोऱ्याने धावा दिल्या, मात्र दुसऱ्याच सामन्यात आम्ही त्यांना 160 च्या जवळपास रोखलं. फलंदाजीमध्ये आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो ही आपल्यातली सर्वात मोठा सकारात्मक बाब असल्याचंही कार्तिक म्हणाला. न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी सामना करणार आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली जगातला सर्वोत्तम क्रिकेटपटू – वासिम जाफर