विश्वचषक स्पर्धेचा सर्वात थरारक अशा अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. या थरारक विजयाबरोबरच इंग्लंडने विश्वचषकाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले. इंग्लंडने ११ व्या विश्वचषकामध्ये विजय मिळवल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांनी संघावर स्तृतीसुमने उधळली आहेत. सर्वच मुख्य वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर इंग्लंडच्या विजयाची बातमी असून अखेर देशात फुटबॉलबरोबरच क्रिकेटचेही वारे वाहू लागल्याची भावना अनेक वृत्तपत्रांनी व्यक्त केली आहे. पाहुयात इंग्लंडमधील प्रमुख वृत्तपत्रांची मुखपृष्ठे…

कोण म्हणतं क्रिकेट कंटाळवाणा खेळ आहे: द टेलिग्राफ

किस दॅट सेज: वी आर ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड – डेली मेल युके

लास्ट बॉल जॉय अॅज इंग्लंड सेल वर्ल्डकप वीन: द गार्डियन

हाऊइज फॉर द गेम ऑफ क्रिकेट: द इंडिपेडंट

कॅम्पेन सुपर ओव्हर: मेट्रो

इंग्लंड (फायनली) विन अ वर्ल्डकप: सन स्पोर्टस

इंग्लंड्स कॅम्पेन सुपर ओव्हर: फायनॅनशिअल टाइम्स

कॅम्पेन सुपर ओव्हर: डेली मिरर

मोस्ट अमेझिंग एण्ड टू क्रिकेट मॅच एव्हर: डेली स्टार

आऊट ऑफ दिस वर्ल्ड: डेली एक्सप्रेस

इंग्लंडने ४४ वर्षांचा वनवास संपवला: द टाइम्स


वर्ल्ड चॅम्पियन्स: आय

वॉवजदॅट: द सन

दरम्यान, या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाल्याने सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांना उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले आहे.