News Flash

विराट-रवी शास्त्री जोडगोळीवर कैफचं टीकास्त्र, म्हणाला…

पहिल्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरला संधी न मिळाल्याने कैफ नाराज

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी मात करत चांगली सुरुवात केली. परंतू विराटसेनेसाठी अजुनही सर्वकाही आलबेल आहे अशातला भाग नाही. पहिल्या टी-२० सामन्यात रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीमुळे संघाचा डाव सावरला. परंतू पहिल्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरला स्थान न मिळाल्यामुळे मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघाला सध्या नेतृत्वबदलाची गरज नाही ! विराट की रोहित चर्चेवर लक्ष्मणची प्रतिक्रिया

“एका क्षणाला श्रेयस अय्यर तुमचा महत्वाचा खेळाडू असतो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सामना संपवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. तुम्ही आयपीएलमधली त्याची कामगिरी पाहा किंवा त्याआधीच्या न्यूझीलंड दौऱ्यातली कामगिरी पाहा…चौथ्या क्रमांकावर खेळत असताना श्रेयसने नाबाद ५०, ३३ अशा धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याचा जम बसला आहे. पण वन-डे मालिकेत एक-दोन सामन्यात ते अपयशी ठरला आणि त्याला पहिल्या टी-२० सामन्यात स्थान मिळालं नाही. श्रेयसला संधी मिळाली नाही याबद्दल मला आश्चर्य नाही, टीम इंडियामधलं वातावरणच असं आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचा विचार करण्याची हीच पद्धत आहे. खेळाडूंनाही माहिती झालं आहे की तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक-दोन सामने मिळतील.” SONY SPORTS वाहिनीवर बोलत असताना कैफने आपली नाराजी व्यक्त केली.

वन-डे मालिकेत श्रेयसची निराशाजनक कामगिरी

 

पहिल्या सामन्यात बाजी मारल्यानंतर रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. दुखापतीमुळे रविंद्र जाडेजाला भारतीय संघात स्थान मिळणार नाहीये…त्यामुळे श्रेयस अय्यरला दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात स्थान मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 11:48 am

Web Title: this is the culture of team india mohammad kaif slams virat kohli ravi shastri for dropping shreyas iyer psd 91
Next Stories
1 विराट कोहलीवर भडकला सेहवाग, म्हणाला…
2 भारतीय संघाला सध्या नेतृत्वबदलाची गरज नाही ! विराट की रोहित चर्चेवर लक्ष्मणची प्रतिक्रिया
3 पहिल्या कसोटीत न्यूझीलंडची बाजी, विंडीजचा डावाने पराभव
Just Now!
X