News Flash

वीरेंद्र सेहवागची पुन्हा एकदा ट्वीटरवर बॅटिंग, मालिकावीर अश्विनवर मजेशीर ट्विट्स

सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले.

वीरेंद्र सेहवाग

भारतीय संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या त्याच्या तडफदार ट्विट्समुळे चर्चेत आहे. सेहवाग क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची ट्विटरवर जोरदार ‘बॅटिंग’ सुरू आहे. गेल्या काही दिवसांत सेहवागने केलेल्या ट्विटला भरभरून पसंती मिळाली होती. सेहवागच्या हजरजबाबी ट्विट्सने अनेक ट्विटरकरांनी कौतुक देखील केले होते. आता पुन्हा एकदा सेहवागने फिरकीपटू आर. अश्विनवर केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर मजेशीर ट्विट केले. इंदूर कसोटीमध्ये आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून तब्बल १३ विकेट्स घेतल्या, तर संपूर्ण कसोटी मालिकेत त्याच्या नावावर २७ विकेट्स जमा झाल्या. अश्विनच्या याच उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावर सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले.

सातव्यांना मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनला शुभेच्छा, फक्त विवाहित पुरूषालाच घरी लवकर जाण्याचे महत्त्व समजू शकते, असे मजेशीर ट्विर सेहवागने केले. सेहवागच्या या ट्विटवर अश्विनच्या पत्नीला हसू अनावर झाले. अश्विनच्या पत्नीने सेहवागला त्वरित रिप्लाय देखील दिला. इतकेच नव्हे, तर सेहवागच्या पत्नीनेही ट्विट केले. सेहवागच्या मजेशीर ट्विटची दखल अश्विननेही घेतली. सेहवागच्या विनोदबुद्धीचे अश्विनने कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:40 pm

Web Title: this twitter conversation between r ashwin wife and virender sehwag is a hit on the internet
Next Stories
1 VIDEO: ‘ड्रेसिंग रुम’मध्ये भारतीय संघाने असे केले विजयाचे सेलिब्रेशन
2 आम्ही जगज्जेते झालो तरी मायदेशी कौतुक होणार नाही!
3 भारताची पराभवाची मालिका कायम
Just Now!
X