News Flash

श्रीलंकेच्या स्फोटक खेळाडूचे सहा चेंडूत सहा षटकार!

अशी कामगिरी करणारा श्रीलंकेचा पहिलाच फलंदाज

श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने मोठा विक्रम नोंदवला आहे. एका षटकात 6 षटकार मारणारा तो श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला. 31 वर्षीय परेराने गेन मेजर क्लब लिमिटेड ओव्हर टूर्नामेंटच्या ग्रुप ए सामन्यात ही कामगिरी नोंदवली. श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब आणि ब्लूमफिल्ड क्रिकेट अॅथलेटिक क्लब यांच्यात हा सामना खेळवला गेला.

50 षटकांचा हा सामना पावसामुळे 41 षटकांचा खेळवला गेला. कर्णधार परेराने शानदार फलंदाजी केल्यामुळे श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या 3 बाद 282 अशी झाली होती. आक्रमक परेराला गोलंदाज दिलहन कुरेला रोखता आले नाही. त्याच्या चार षटकांत 73 धावा फटकावल्या गेल्या. म्हणजेच प्रत्येक षटकात त्याला 18.75 धावा चोपल्या. त्यामुळे आर्मी स्पोर्ट्स क्लबने 41 षटकांत 3 बाद 318 धावा केल्या. ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्स क्लबचा पराभव निश्चित दिसत होता. त्याची धावसंख्या 17 षटकांत 6 बाद 73 अशी होती. मात्र पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

 

एका षटकात 6 षटकार ठोकणारा थिसारा परेरा नववा खेळाडू ठरला. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे काम करणारा तो सहावा फलंदाज आहे. हर्शल गिब्स, युवराज सिंग आणि कायरन पोलार्ड हे तीनच फलंदाज आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला आहे.

गारफिल्ड सोबर्स यांनी ठोकले होते 6 षटकार

सर गारफिल्ड सोबर्स अशी कामगिरी करणारे पहिले फलंदाज होते. 1968 मध्ये त्यांनी हा करिश्मा केला होता. तर, रवी शास्त्री यांनी (1985) एका षटकात सहा षटकार लगावले. यानंतर, पुढच्या 22 वर्षांत असे काही घडले नाही. 2007च्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या हर्षेल गिब्सने एका षटकात 6 षटकार ठोकले. 2007च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात एका षटकात 6 षटकार लगावले.

दहा वर्षांनंतर इंग्लंडच्या रॉस व्हाइटलीने यॉर्कशायर वायकिंग्जविरूद्ध नेटवेस्ट टी-20 ब्लास्टमध्ये 6 षटकार ठोकले. 2018मध्ये अफगाणिस्तानाच्या हजरतुल्ला जाझाईने तसेच 2020मध्ये न्यूझीलंडच्या लिओ कार्टरने हीच कामगिरी केली. काही आठवड्यांपूर्वी वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध अकिला धनंजयाला 6 षटकार ठोकले. थिसारा परेरा हा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 6 षटकार ठोकणारा दुसरा क्रिकेटपटू आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:35 pm

Web Title: thisara perera become first sri lankan to hit six sixes in an over adn 96
Next Stories
1 यॉर्कर, फुल टॉस, करनचे घसरणे आणि चौकारावर आनंद
2 टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान करणार झिम्बाब्वेचा दौरा
3 इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याचा ‘कमाल’ झेल!
Just Now!
X