News Flash

भारताचे तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र

चालण्याच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

 

राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. त्यामुळे संदीप, प्रियांका आणि राहुल कुमार या भारताच्या तीन खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

आता टोक्यो ऑलिम्पिकसाठी चालण्याच्या शर्यतीत पात्र ठरलेल्या खेळाडूंची संख्या पाच झाली आहे. याआधी के . टी. इरफान आणि भावना जट यांनी पात्रता निकष पार केले होते. संदीपने एक तास २० मिनिटे १६ सेकंद अशी वेळ नोंदवत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. प्रियांकाने १ तास २८ मिनिटे ४५ सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदक संपादन केले. राहुल याने पुरुष गटात १ तास २० मिनिटे २६ सेकंद अशा कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे. संदीप याने ५० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

नवदीप, अरविंद यांना सुवर्ण

दुबई : पॅराअ‍ॅथलिट नवदीप आणि अरविंद यांनी १२व्या फझ्झा आंतरराष्ट्रीय जागतिक पॅराअ‍ॅथलेटिक्स ग्रां. प्रि. स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत टोक्यो पॅरालिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत नऊ सुवर्णपदकांसह १७ पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या भालाफेक एफ-४१ प्रकारात नवदीपने ४३.५८ मीटर कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. अरविंदने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात १४.०५ मीटर इतकी कामगिरी नोंदवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:09 am

Web Title: three indian athletes qualify for the olympics abn 97
Next Stories
1 ‘टीम इंडिया’चा (रो)हिट फॉर्म्युला!! पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल
2 IND vs ENG: रोहित शर्माचा पराक्रम; ख्रिस गेलच्या विक्रमाशी केली बरोबरी
3 IND vs ENG: मुंबईचा रोहित जगात भारी! ‘असा’ विक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू
Just Now!
X