News Flash

गोल्फपटू टायगर वुड्सची १ अब्ज डॉलरची विक्रमी कमाई!

गोल्फपटूंच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या टायगर वुड्सने गेल्या वर्षी ८३ दशलक्ष डॉलर्सची कमाई करत आपल्या करिअरमध्ये १.३ अब्ज डॉलर कमाईचा विक्रम केला आहे.

| January 9, 2014 04:22 am

गोल्फपटूंच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या टायगर वुड्सने गेल्या वर्षी ८३ दशलक्ष डॉलर्सची कमाई करत आपल्या करिअरमध्ये १.३ अब्ज डॉलर कमाईचा विक्रम केला आहे.
क्रिडापटूंमध्ये कमीतकमी वेळात १ अब्ज डॉलरची कमाई करणारा टायगर वुड्स पहिला खेळाडू ठरला आहे. २०१३ सालात टायगरने एकूण पाच गोल्फ स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. यातून त्याला ही विक्रमी कमाई गाठता आली आहे. त्यात जाहीरांतूमधूनही २०१३ वर्षात चांगली कमाई प्राप्त झाली आहे. तर, श्रीमंत गोल्फपटूंच्या यादीत दुसऱया स्थानी अमेरिकेचा गोल्फपटू फिल मिकेल्सन असून ५२ कोटी डॉलर्स एवढी त्याची संपत्ती आहे. त्यात ४५ दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न हे जाहिराती माध्यमांतून त्याला प्राप्त झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 4:22 am

Web Title: tiger woods career earnings getting closer to 1billion
टॅग : Sports
Next Stories
1 कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन : ज्वाला-अश्विनीची विजयी सलामी
2 ‘सूर्य’कुमार तळपला!
3 सिडनी टेनिस स्पर्धा : बोपण्णा-कुरेशी उपांत्य फेरीत
Just Now!
X