News Flash

दुखापतीमुळे दिलशान आशिया चषक क्रिकेट स्पध्रेतून माघार घेण्याची शक्यता

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या उर्वरित मालिकेत खेळणार नाही.

| February 22, 2014 04:26 am

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या बोटाला  झालेल्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या उर्वरित मालिकेत खेळणार नाही. याचप्रमाणे आगामी आशिया चषक क्रिकेट स्पध्रेतूनही तो माघार घेण्याची शक्यता आहे.२५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पध्रेला तो मुकण्याची शक्यता आहे. कारण १६ मार्चपासून बांगलादेशमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पध्रेसाठी निवड समितीला तो श्रीलंका संघात हवा आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या मालिकेत दिलशानच्या जागी मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज लाहिरू थिरिमानेला संघात स्थान देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2014 4:26 am

Web Title: tillakaratne dilshan doubtful for asia cup due to finger injury
Next Stories
1 झहीरची भूमिका मोलाची -अक्रम
2 फेडरर अजूनही ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावू शकतो -सॅम्प्रस
3 चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : क्रूस क्षेपणास्त्रापुढे अर्सेनेल भुईसपाट!
Just Now!
X