यष्टीरक्षक यष्टीमागून गोलंदाजांना मार्गदर्शन करताना अनेकवेळा तुम्ही पाहाता. कसोटीमध्ये फलंदाजाचा सयंम तोडण्याासाठी यष्टीरक्षक अनेकवेळा स्लेजिंग करतो. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असेलेल्या कसोटी मालिकेत यष्टींमागून रिषभ पंत आणि टीम पेन प्रतिस्पर्धी संघाना स्लेजिंग तर स्वत:च्या संघाना सतत मार्गदर्शन करताना दिसत आहेत. मेलबर्न येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेनने पंतला डिवचले आहे. ‘धोनी भारतीय संघात परतला आहे. तेव्हा तू आता होबार्ट हरिकेन्सकडून खेळायला सुरवात कर’ असा सल्ला पेनने पंतला दिला.

भारत-ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी क्रिकेट सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण 15 गडी बाद झाले. रिषभ पंत फलंदाजीला आल्यानंतर पेनने त्याला खिजविण्यात सुरवात केली. एकदिवसीय संघात आता धोनी परतला आहे. तू आता होबार्ट हरिकेन्सकडून खेळायला सुरवात कर. होबार्ट हे छान शहर आहे एकदा विचार कर, असे पेनने डिवचले. हे सगळे यष्टींमधील बोलणं माईकमध्ये रेकॉर्ड झाले.  मात्र, पंतने पेनच्या या वक्तव्याला काहीच प्रतिसाद दिला नाही, आणि आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले.

 दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने पकड मिळवली आहे. भारताकडे ३४६ धावांची आघाडी आहे.