News Flash

आऊट की नॉट आऊट?? तिसऱ्या पंचांची टीम पेनवर मेहरनजर, माजी खेळाडूंकडून आश्चर्य व्यक्त

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपला

जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन आणि नवोदीत मोहम्मद सिराजच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर मेलबर्न कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपवला. लाबुशेन आणि ट्रॅविस हेडचा अपवाद वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. पहिल्या डावादरम्यान तिसरे पंच पॉल विल्सन यांनी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम बेन धावबाद असल्याचं अपील फेटाळून लावत ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निर्णय दिला. ज्यामुळे सोशल मीडियावर माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलंय.

५५ व्या षटकादरम्यान कर्णधार पेन आणि ग्रीन यांच्यात एक धाव काढताना संभ्रम निर्माण झाला. यावेळी उमेश यादवने पेनच्या दिशेने थ्रो केला आणि यष्टीरक्षक पंतने धावबाद करण्यासाठी स्टम्प उडवले. तिसऱ्या पंचांच्या पाहणीमध्ये पेनची बॅट ही क्रिजच्या पुढे गेल्याचं कोणत्याही कॅमेरा अँगलमधून दिसत नव्हतं. तरीही पंच पॉल विल्सन यांनी पेन नाबाद असल्याचा निर्णय दिला.

तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर अनेक खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त करत आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान तिसऱ्या पंचांनी कर्णधार पेनवर मेहरनजर केली असली तरीही भारतीय संघाला याचा फारसा फटका बसला नाही. चहापानानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 12:01 pm

Web Title: tim paine run out or not third umpires call during boxing day test at mcg leaves cricket fraternity divided psd 91
Next Stories
1 VIDEO: भरमैदानात पंचांनी केलं असं काही की… तुम्हालाही येईल हसू
2 दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ऑस्ट्रेलियातही पाठिंबा, पाहा व्हिडीओ
3 Ind vs Aus : कांगारुंची पहिल्या डावात १९५ पर्यंत मजल, बुमराह-आश्विनचा भेदक मारा
Just Now!
X