News Flash

IPL 2021 दरम्यानचे भारतामधील करोनासंदर्भातील अनुभव सांगताना न्यूझीलंडच्या खेळाडूला अश्रू अनावर

बोलता बोलता तो अचानक रडू लागला

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टिम सीफर्ट हा एका ऑनलाइन मुलाखतीमध्ये भारतामधील करोना परिस्थितीसंदर्भातील आपले अनुभव सांगताना रडू लागला. आयपीएलसाठी भारतामध्ये असतानाच करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी सांगण्यात आल्याचं टिमने मुलाखतीमध्ये म्हटलं. एकीकडे जेव्हा टिम करोना पॉझिटिव्ह आढळून आला त्याचवेळी दुसरीकडे त्याच्या देशात खेळाडूंना घेऊन जाणारी सर्व चार्टड प्लेन्स आधीच रवाना झाल्याचंही त्याने स्पष्ट केलं. इंडियन प्रीमियर लीगचं १४ वे सत्र करोनामुळे अर्ध्यात स्थगित करण्यात आलं. आयपीएलच्या आयोजनादरम्यान बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने अनेक खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ करोना पॉझिटिव्ह आढळून आले त्यानंतर ही मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये टिम सीफर्ट कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातून खेळत होता. मालिका रद्द झाल्यानंतर न्यूझीलंडमधील आपल्या देशाच्या खेळाडूंबरोबर परतीच्या विमानामध्ये बसण्याआधी करोनाच्या पीसीआर चाचणीमध्ये टिमला करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या टिम न्यूझीलंडमध्ये आपल्या घरी १४ दिवस आयसोलेशनमध्ये आहे. याचदरम्यान त्याने एका ऑनलाइन मुलाखतीमध्ये सहभाग नोंदवला. भारतामध्ये असतानाच करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर काय घडलं याबद्दल बोलताना टिम भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक असणाऱ्या माइकल हसीसोबतच टिमवरही चेन्नईतील एका खासगी रुग्णालयामध्ये करोनावरील उपचार करण्यात आले. “मला जेव्हा करोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं तेव्हा मला काही क्षण जग थांबल्यासारखं झालं. मला वास्तवाचं भान नव्हतं. पुढे काय होणार नाही याची मला कल्पना नव्हती. तुम्ही एखाद्या वाईट गोष्टींबद्दल ऐकता आणि विचार करता. तसच माझ्यासोबतही झालं,” असं टिमने सांगितलं. आपला हा अनुभव सांगताना २६ वर्षीय टिम रडू लागला. नंतर थोडं थांबून त्याने पुढे परत आला अनुभव सांगितले. टिमने २०२१ च्या आयपीएलमध्ये कोलकात्याकडून एकही सामना खेळला नाही. मात्र संघासोबतच असल्याने त्याला करोनाची लागण झाली. करोनावर मात केल्यानंतर टिम मायदेशी परतला.

न्यूझीलंड संघाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही या मुलाखतीमधील काही सेकंदांचा भाग ट्विट करण्यात आला असून भारतातील परिस्थितीपेक्षा आपल्याकडी परिस्थिती चांगली असून किमान आपण बाहेर तरी पडू शकतोय, असं टिमने म्हटलं आहे.

सध्या आपण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही टिमने म्हटलं आहे. “माझी होणारी पत्नी खूपच खूश आहे. मी नियोजित वेळेच्या आधीच मायदेशी आलोय आणि आता आम्ही लग्नाची तयारी करत आहोत,” असं टिम म्हणाला. पुढील दोन महिन्यांमध्ये हे टिम प्रेयसीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 3:25 pm

Web Title: tim seifert cried talking about being covid 19 positive during ipl 2021 scsg 91
Next Stories
1 ‘‘कपिल देवनं फास्ट बॉलिंगला SEXY बनवलं”
2 VIDEO : भारतातील ‘करोनानुभव’ सांगताना KKRच्या क्रिकेटपटूला झाले अश्रू अनावर
3 करोनाचा सामना करण्यासाठी RCB तयार, ४५ कोटींच्या मदतीची घोषणा
Just Now!
X