02 March 2021

News Flash

टायटन्ससमोर चेन्नईचे आव्हान

आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदांवर सातत्याने मोहोर उमटवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा टायटन्सशी

| September 22, 2013 04:47 am

आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदांवर सातत्याने मोहोर उमटवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा टायटन्सशी मुकाबला रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या सक्षम नेतृत्वाखाली खेळणारा सुपर किंग्जचा संघ मैदानाबाहेरील वादविवाद बाजूला ठेवत दमदार प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मुरली विजय, माइक हसी, सुरेश रैना, धोनी यांच्यावर चेन्नईच्या फलंदाजीची मदार आहे. ख्रिस मॉरिस, रविचंद्रन अश्विन, मोहित शर्मा या त्रिकुटावर गोलंदाजांची जबाबदारी आहे. ड्वेन ब्राव्हो, अल्बी मॉर्केल आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू चेन्नईचे बलस्थान आहे. ए. बी. डी’व्हिलियर्स आणि मॉर्नी मॉर्केल या अनुभवी खेळाडूंची कामगिरी टायटन्ससाठी महत्त्वपूर्ण आहे. र्मचट डि लाँज आणि कॉर्निलिअस डी’व्हिलियर्स या वेगवान गोलंदाजांकडून टायटन्सला मोठय़ा अपेक्षा आहेत.
वेळ : रात्री ८ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार स्पोर्ट्स   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 4:47 am

Web Title: titan faces challenge of chennai in champions league
Next Stories
1 कमकुवत संघांमधील मुकाबला
2 विश्वचषक कुस्तीतील भारताचे स्थान निश्चित
3 तगडय़ा संघांमध्ये मुकाबला रंगणार
Just Now!
X