कर्णधार आर. विनयकुमारने फक्त ३४ धावांत पाच बळी घेत तामिळनाडूचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळला, मात्र तामिळनाडूने लक्ष्मीपती बालाजीच्या (३/१०)  प्रभावी माऱ्याच्या जोरावर त्यांची पहिल्या डावात ४ बाद ४५ अशी स्थिती करत रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी रंगत निर्माण केली.
विनयकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गतविजेत्या कर्नाटकने तामिळनाडूचा पहिला डाव चहापानानंतर २८ मिनिटांत आटोपला. सातव्याच षटकात त्याने सलामीवीर मुरली  बाबा अपराजित आणि एका बाजूने झुंजार खेळ करणारा अभिनव मुकुंद (३५) यांनाही बाद केले.
कर्नाटकने केवळ १६ धावांत रवीकुमार समर्थ (१४), शिशिर भावने (१), रॉबिन उथप्पा (०) यांना गमावले. दिवसअखेर कर्नाटकची ४ बाद ४५ अशी स्थिती होती.

संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू (पहिला डाव) : १३४ (अभिनव मुकुंद ३५ ; विनयकुमार ५/३४, अभिमन्यू मिथुन ३/५४)
कर्नाटक (पहिला डाव) : ४ बाद ४५ (अभिमन्यू मिथुन खेळत आहे १४, लक्ष्मीपती बालाजी ३/१०).