ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आगामी इंडियन प्रमिअर लीग स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याऐवजी मॅक्सवेल काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातलं आपलं स्थान निश्चीत करण्यासाठी मॅक्सवेलने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. २०१७ साली बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात मॅक्सवेलला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात अखेरचं स्थान मिळवलं होतं. यानंतर सध्या सुरु असलेल्या भारताविरुद्ध कसोटी मालिकेतही त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं.

अवश्य वाचा – IND vs AUS : दुसऱ्या कसोटीलाही पृथ्वी शॉ मुकणार, राहुल-विजयला आणखी एक संधी

जोए बर्न्स, जेम्स फॉल्कनर या आपल्या सहकाऱ्यांसह मॅक्सवेल लँकेशायर संघाकडून काऊंटी क्रिकेटचा हंगाम खेळणार आहे. कसोटी क्रिकेट संघात मला आपलं स्थान पक्क करायचं आहे, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं मॅक्सवेलने हेराल्ड सन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेणं हा माझ्यासाठी कठोर निर्णय होता. मात्र कसोटी क्रिकेट खेळायला न मिळणं ही सल मनात कुठेतरी कायम होती. मॅक्सवेलने आपल्या भावना बोलून दाखवल्या.

अवश्य वाचा – IND vs AUS : रोहित, अश्विन OUT; दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

मला कसोटी क्रिकेटमध्ये अजुनही खेळण्याची इच्छा आहे, आणि ऑस्ट्रेलियन संघासाठी अजुनही मी माझी १०० टक्के कामगिरी बजावू शकतो. अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात करत भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – पुन्हा 37 वर बाद झालास तर याद राख, युवराजची हिटमॅनला ताकीद !