News Flash

Tokyo 2020 : ऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित; बॉक्सर लव्हलिनाची उपांत्य फेरीत धडक

लव्हलिनाने चीनच्या चेन निन चेनशीवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये  भारताचं पदक निश्चित केलं आहे.

Tokyo 2020 Boxer Lovelina win Semifinals  country second medal in the Olympics is certain

भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने दोन दिवसांपूर्वी कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली होती. शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लव्हलिनाने चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर सरशी साधत मात केली आहे. लव्हलिनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदक निश्चित केलं आहे.

बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते. लव्हलिनाची उपांत्य फेरीत २०१९ च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अ‍ॅना लिसेन्कोशी लढत होईल.

लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 9:25 am

Web Title: tokyo 2020 boxer lovelina win semifinals country second medal in the olympics is certain abn 97
Next Stories
1 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खूशखबर; दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये धडक
2 विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : डुडाकडून विदित पराभूत
3 भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिका : मालिका पराभवाची भारतावर नामुष्की!
Just Now!
X