टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ७ पदक पटकावली आहे. त्यात एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंचावर आल्यानंतर सर्वांना सुवर्ण पदक दाखवलं. “ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद”, असं नीरज चोप्रा याने सांगितलं.

‘मी कांस्य पदकाची लढत गुडघ्याच्या कॅपशिवाय खेळलो. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असती तर मला विश्रांती घ्यावी लागली असती. मात्र ही लढत माझं आयुष्य बदलणारी होती. मी माझं सर्वोत्तम दिलं.” असं कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सांगितलं.

Live Blog

20:50 (IST)09 Aug 2021
"सुवर्ण पदक संपूर्ण देशाचं आहे", नीरज चोप्राने व्यक्त केल्या भावना

गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंचावर आल्यानंतर सर्वांना सुवर्ण पदक दाखवलं. "ज्या दिवसांपासून मेडल माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद", असं नीरज चोप्रा याने सांगितलं

20:42 (IST)09 Aug 2021
"कांस्य पदकाच्या लढाईत मी सर्वोत्तम दिले", बजरंग पुनियाने व्यक्त केल्या भावना

मी कांस्य पदकाची लढत गुडघ्याच्या कॅपशिवाय खेळलो. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असती तर मला विश्रांती घ्यावी लागली असती. मात्र ही लढत माझं आयुष्य बदलणारी होती. मी माझं सर्वोत्तम दिलं.

20:28 (IST)09 Aug 2021
ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राचा सत्कार
20:26 (IST)09 Aug 2021
ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता रवि दहिया याचा सत्कार
20:20 (IST)09 Aug 2021
"पुढच्या वेळेस भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणार"; बॉक्सर लव्हलिनाचा निर्धार
20:16 (IST)09 Aug 2021
"पंतप्रधान मोदी नीरज आणि सिंधूसोबत पाणीपुरी, आइसक्रिम खातील"- क्रीडामंत्री
20:12 (IST)09 Aug 2021
कांस्य पदक विजेत्या पुरुष हॉकी संघाचा याचा सत्कार

कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाचा सत्कार करण्यात आला. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला. पुरुष हॉकी संघानं ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं.

20:07 (IST)09 Aug 2021
कांस्य पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिचा सत्कार

कांस्य पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिचा सत्कार क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिला बॉक्सर टीमचे प्रशिक्षक राफेल बरगमॅस्को यांनाही गौरविण्यात आलं.

20:04 (IST)09 Aug 2021
कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा सत्कार

कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा सत्कार क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला.

19:59 (IST)09 Aug 2021
"नव्या भारताचे नवे हिरो"; क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा
19:46 (IST)09 Aug 2021
नीरज चोप्रा आणि रवि दहिया व्यक्त केला आनंद

सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रजत पदक विजेता कुस्तीपटू रवि दहिया आनंद व्यक्त केला. यावेळी छायाचित्रकारांनी त्यांची छबी टीपली.

19:33 (IST)09 Aug 2021
Live Updates : "भारतासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचा आनंद वाटतो", नीरज चोप्राने व्यक्त केल्या भावना

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं.

19:20 (IST)09 Aug 2021
पुरुष हॉकी संघाने केक कापत जल्लोष केला

पुरुष हॉकी संघानं ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं. हा आनंद मायदेशी परतल्यानंतर केक कापत साजरा केला. यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

19:10 (IST)09 Aug 2021
महिला हॉकी संघाने केक कापत साजरा केला आनंद

महिला हॉकी संघानं हॉटेल अशोकामध्ये केक कापत आनंद साजरा केला. महिला हॉकी संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचला होता.


18:48 (IST)09 Aug 2021
कुस्तीपटू बजरंग पुनियाचे सत्कार समारंभाच्या ठिकाणी आगमन

कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया हॉटेलमध्ये पोहोचला आहे, जिथे लवकरच पदक विजेत्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.





18:18 (IST)09 Aug 2021
नीरजसाठी दिल्लीत लोकांनी केली गर्दी

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रासाठी दिल्लीत लोकांनी तुफान गर्दी केली.

 

18:13 (IST)09 Aug 2021
बजरंग पुनियाचे दिल्लीत जोरदार स्वागत

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.

17:35 (IST)09 Aug 2021
नीरज चोप्राचे दिल्लीत आगमन

टोक्यो ऑलिम्पिकमघ्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले आहे.

17:14 (IST)09 Aug 2021
कुस्तीपटू रवी दहियाचे होणार जल्लोषात स्वागत

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत रौप्यपदक पटकावणाऱ्या रवी दहियाचे स्वागत करण्यासाठी त्याचे कुटुंब दिल्ली विमाकनतळावर आले आहे. "आमच्या गावातील रहिवासी खूप आनंदी आहेत. असे क्षण अत्यंत दुर्मिळ असतात," असे रवी दहियाचे वडील राकेश दहिया यांनी म्हटले आहे. 

16:52 (IST)09 Aug 2021
भारताला अॅथलेटिक्स संघ दिल्लीत दाखल

भारताला अॅथलेटिक्स संघ दिल्लीत दाखल झाला आहे. 

15:40 (IST)09 Aug 2021
केव्हा आणि कुठे उतरणार खेळाडू?

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय खेळाडू सोमवारी संध्याकाळी भारतात परततील. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांचे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. यानंतर, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कडून विजेत्या खेळाडूंना सन्मानित केले जाईल. 

15:35 (IST)09 Aug 2021
पदकतालिकेत कोणाला जास्त पदके?

पदकतालिकेत अमेरिकेने ३९ सुवर्ण, ४१ रौप्य आणि ३३ कांस्य यासह एकूण ११३ पदके जिंकली, तर चीनने २८ सुवर्ण, ३२ रौप्य आणि १८ कांस्यसह एकूण ८८ पदकांची कमाई केली आहे. तसेच यजमान जपानच्या खात्यात ५८ पदके आली, ज्यात २७ सुवर्ण, १४ रौप्य आणि १७ कांस्य पदके आहेत. भारताने ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, २ रौप्य आणि ४ पदके जिंकली. यापूर्वी भारताची सर्वोत्तम कामगिरी २०१२लंडन ऑलिम्पिकमध्ये झाली जिथे त्यांनी ६ पदके जिंकली होती.