News Flash

टोकियो ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना दिले जाणार १,६०,००० लाख मोफत ‘कंडोम’

खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावर याचा वापर करावा, अशी आयोजकांची भूमिका

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२१

यंदा जपानच्या टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकची तयारी जोरात सुरू आहे. करोना कालावधीत ऑलिम्पिक यशस्वीरित्या आयोजित करणे, हे आयोजक समितीसमोर मोठे आव्हान आहे. ऑलिम्पिक परंपरेनुसार खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंना मोफत कंडोम देण्यात येणार आहेत. सुमारे १,६०,००० कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. पण, या कंडोमच्या वापराबाबत एक समस्या समोर आली आहे.

ऑलिम्पिक आयोजन समितीने स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मोफत कंडोमच्या वापराला मनाई केली आहे. ऑलिम्पिकची आठवण म्हणून हे कंडोम घरी आपल्या देशात घेऊन जायचे असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावर याचा वापर करावा, अशी आयोजन समितीची भूमिका आहे.

हेही वाचा – WTC Final : विराट-रोहितसाठी ‘ही’ असणार चिंतेची बाब, दिलीप वेंगसरकरांनी दिलं मत

ऑलिम्पिक आणि कंडोमची परंपरा

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९८८पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमी कंडोमचे वाटप केले जाणार आहे. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने ४,५०,००० कंडोमचे वाटप केले होते.

हेही वाचा –  महान क्रिकेटपटू सुनील गावसकर टीम इंडियाचे कोच का होऊ शकले नाहीत?

प्रत्येक खेळाडूला मिळणार ‘इतके’ कंडोम

२०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास ११,००० खेळाडूंना प्रत्येकी १४ कंडोम मिळणार आहेत. करोनाला आळा घालण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी संपर्क ठेवावा, अशी सूचना ऑलिम्पिकचे आयोजक करत आहेत. आपल्या या कार्यक्रमाची घोषणा करताना ऑलिम्पिक समितीने ३३ पानांचे एक पुस्तकदेखील प्रसिद्ध केले आहे. यात एकमेकांसोबत शारिरीक संपर्क टाळण्याविषयी सांगितले गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 5:43 pm

Web Title: tokyo olympics bound athletes to get over 160000 condoms adn 96
Next Stories
1 WTC Final : विराट-रोहितसाठी ‘ही’ असणार चिंतेची बाब, दिलीप वेंगसरकरांनी दिलं मत
2 महान क्रिकेटपटू सुनील गावसकर टीम इंडियाचे कोच का होऊ शकले नाहीत?
3 पाकिस्तानला मिळाला नवा ‘धोनी’..! १०० किलोचा ‘हा’ क्रिकेटपटू ठोकतो उत्तुंग षटकार
Just Now!
X