News Flash

Tokyo 2020 : बॉक्सर पूजा राणीचा शुभारंभ, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या खेळाडूला ५-० असे हरवले.

Tokyo olympics boxer pooja rani defeats Ichrak Chaib of algeria in womens middleweight round of 16
बॉक्सर पूजा राणी

भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला. पाच पंचांनी पूजाला १० पैकी १० गुण दिले. पूजा ७५ किलो वजनी गटात खेळत आहे. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.

 

आशियाई चॅम्पियन आणि या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय खेळाडू पूजा राणीने २० वर्षीय इचार्कला ५-० असे सहज हरवले. पूजाने तिच्या अनुभवाचा उपयोग करत इचार्क आणि सामन्यावर नियंत्रण राखले. या सामन्यात पूजाने संयम दाखवत नवख्या इचार्कला गुण मिळवण्याची संधी दिली नाही.

३० वर्षीय पूजा तिच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. मे महिन्यात झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी मार्चमध्ये तिने विश्वविजेतीअथेन्या बायलनवर सरशी साधली होती. या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 3:26 pm

Web Title: tokyo olympics boxer pooja rani defeats ichrak chaib of algeria in womens middleweight round of 16 adn 96
Next Stories
1 SL vs IND 2nd T20 : कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार लाइव्ह सामना?
2 अल्पवयीन मुलींसोबत Sex Chatting करणाऱ्या इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; पोलिसांकडून सामना सुरु असतानाच कारवाई
3 Tokyo Olympics : साताऱ्याच्या प्रविण जाधवने सेकंड सीडेड खेळाडूचा पराभव केला पण…
Just Now!
X