Advertisement

Tokyo 2020 Hockey: ४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव

अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.

Live Blog
09:05 (IST)05 Aug 2021
भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांकडून आनंद साजरा
09:00 (IST)05 Aug 2021
नरेंद्र मोदींकडून ट्वीट करत अभिनंदन
08:50 (IST)05 Aug 2021
जिंकलो ! ४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास

भारतीय संघाने सामना जिंकला असून इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक जिंकलं आहे. 

08:48 (IST)05 Aug 2021
श्रीजेशने वाचवला गोल

फक्त सहा सेकंद बाकी असताना जर्मनीला पेनाल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. पण पीआर श्रीजेशने गोल वाचवत भारताची विजयाची आशा कायम ठेवली.

08:45 (IST)05 Aug 2021
चार मिनिटं बाकी असतानाच जर्मनीचा मोठा निर्णय

जर्मनीने सामन्यातील शेवटच्या क्षणी महत्वाचा निर्णय घेतला आहे. जर्मनीने आपला गोलकिपर काढला आहे. यामुळे भारताकडे संधी चालून आली आहे. 

08:41 (IST)05 Aug 2021
मनदीपने सहाव्या गोलची संधी गमावली

एक खेळाडू कमी असल्याने सध्या जर्मनीवर दबाव आहे. दरम्यान मनदीपने सहावा गोल करण्याची संधी गमावली आहे. मनदीपने गमावलेली ही संधी महागात पडू शकते  का ?

08:38 (IST)05 Aug 2021
जर्मनीच्या कर्णधाराला यलो कार्ड

चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनी संघाच्या कर्णधाराला यलो कार्ड देण्यात आलं आहे. जर्मनीकडून १० खेळाडू मैदानात असून भारतीय संघाला याचा फायदा घेण्याची संधी आहे. 

08:32 (IST)05 Aug 2021
भारत एक गोलने आघाडीवर

लुकॅस विंडफेडरने जर्मनीला लाइफलाइन दिली आहे. पेनाल्टी कॉर्नरमधून त्याने गोल करत जर्मनीला सामन्यात अजून कायम ठेवलं आहे. पीआर श्रीजेश पायाच्या मधून गेलेला हा गोल रोखू शकला नाही. भारताने अद्यापही एक गोलने आघाडीवर आहे. 

08:30 (IST)05 Aug 2021
जर्मनीकडून चौथा गोल

चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने गोल करत पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं आहे. जर्मनीने गोल केला असल्याने आता स्कोअर ५-४ आहे. 

08:28 (IST)05 Aug 2021
भारताकडून इतिहास रचला जाण्याची शक्यता

भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने जबरदस्त कमबॅक केलं. विजयाचा निर्धार करत भारतीय संघ मैदानात उतरल्याचं स्पष्ट दिसत होतं. सिमरनजीत आणि हरमनप्रीतने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. भारताचं हे पुनरागमन पुढील अनेक वर्ष लक्षात ठेवलं जाईल. भारत सध्या ५-३ ने आघाडीवर आहे. 

08:22 (IST)05 Aug 2021
तिसरा क्वार्टर संपला

तिसरा क्वार्टर संपला असून भारताने ५-३ ची आघाडी कायम ठेवली आहे. भारताला कांस्यपदक मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

08:19 (IST)05 Aug 2021
भारताने पेनाल्टीची संधी गमावली

यलो कार्ड मिळाल्याने जर्मनीच्या एका खेळाडूला मैदान सोडावं लागलं आहे. भारतासाठी हे खूप फायद्याचं असून जर्मनीवर दबाव आणण्याची संधी होती. पण भारताने तीन पेनाल्टी कॉर्नरमधून गोल करण्याची संधी गमावली आहे. भारतीय संघ एकही गोल करु शकला नाही. भारत सध्या ५-३ ने आघाडीवर आहे. 

08:13 (IST)05 Aug 2021
भारताकडून पाचवा गोल

भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्यात वर्चस्व मिळवलं आहे. गेल्या १० मिनिटांपासून भारतीय खेळाडू आक्रमक खेळी दाखवत आहेत. भारताकडून अजून एक गोल करत ५-३ आघाडी घेतली आहे. गुरजंतने हा गोल केला. 

08:09 (IST)05 Aug 2021
GOAL! भारताकडून चौथा गोल

रुपिंदर पालने पेनाल्टी स्ट्रोक मारत भारताला चौथा गोल करुन दिला. भारताने सामन्यात ४-३ ने आघाडी घेतली आहे. भारताने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं असून तिसऱ्या क्वार्टरमध्ये ४-३ ने आघाडी घेतली. 

08:08 (IST)05 Aug 2021
भारताने ३-३ ने केली बरोबरी

मात्र भारताने पुनरागम करत दुसरा गोल केला. हार्दिक सिंगने केलेल्या गोलमुळे भारताला दिलासा मिळाला. यानंतर भारताने हाफ टाइमच्या आधी अजून एक गोल करत ३-३ ने बरोबरी साधली.

 
20
READ IN APP
X
X