20 January 2021

News Flash

टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य!

‘आयओसी’चे सदस्य रिचर्ड पौंड यांचा इशारा

जपानसह काही देशांमध्ये करोनाची साथ पुन्हा तीव्र झाल्यामुळे येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यांत लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अवघड आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

टोक्योसहित काही राज्यांमध्ये जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी गुरुवारी आणीबाणी जाहीर केली आहे. यासंदर्भात कॅनडाचे ‘आयओसी’ सदस्य रिचर्ड पौंड यांनी ‘बीसीसी’ वृत्तवाहिनीवर म्हटले की, ‘‘सध्या करोना संसर्गाची रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे ऑलिम्पिकबाबत अनिश्चितता पसरली आहे.’’

जपानमध्ये गुरुवारी २,४४७ नव्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे लागू करण्यात आलेली आणीबाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीतही ऑलिम्पिक होईल, अशी संयोजकांना आशा आहे. परंतु याकरिता कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, असे पौंड यांनी सांगितले. खेळाडूंना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन पौंड यांनी केले आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक आयोजित केले जाणार आहे.

नागरिकांचा ऑलिम्पिकला विरोध

जपानमधील नागरिकांनी ऑलिम्पिकसाठी नकार दर्शवला आहे. ‘एनएचके’ राष्ट्रीय वाहिनीने १२०० नागरिकांच्या केलेल्या सर्वेक्षणांतर्गत ६३ टक्के नागरिकांनी ऑलिम्पिक पुढे ढकलावे किंवा रद्द करावे, असे मत नोंदवल्याने आयोजकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खर्चात २.८ अब्ज डॉलर वाढ

जुलै-ऑगस्टदरम्यान होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकसाठीचा नवा अर्थसंकल्प १५.४ अब्ज डॉलपर्यंत जाणार आहे. म्हणजेच आधीच्या खर्चात २.८ अब्ज डॉलर वाढ होणार आहे. यापैकी ६.७ अब्ज डॉलर निधी हा नागरिकांचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 2:08 am

Web Title: tokyo olympics ioc coronavirus mppg 94
Next Stories
1 भारतासाठी ‘शुभ’वर्तमान!
2 राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन करणाऱ्या संघटनांनाच मान्यता
3 IND vs AUS: रोहित-गिल जोडीचा धमाका! तब्बल ११ वर्षांनी केला ‘हा’ पराक्रम
Just Now!
X