News Flash

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : ऑलिम्पिकसाठी शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय

 टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार असून, आतापर्यंत एकूण १०० भारतीय क्रीडापटू यासाठी पात्र ठरले आहेत.

| June 11, 2021 11:04 pm

‘‘क्रीडापटूंची कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने मर्यादित संख्येत अधिकाधिक साहाय्यक मार्गदर्शकांना टोक्योला पाठवण्याचे धोरण आखले आहे.

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारतीय पथकात अधिकाधिक साहाय्यक मार्गदर्शकांचा समावेश करता यावा, यासाठी शुक्रवारी क्रीडा केंद्रीय मंत्रालयाने आपले शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार असून, आतापर्यंत एकूण १०० भारतीय क्रीडापटू यासाठी पात्र ठरले आहेत. आणखी २५ ते ३५ जण पात्र ठरण्याची शक्यता आहे. ‘‘क्रीडापटूंची कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने मर्यादित संख्येत अधिकाधिक साहाय्यक मार्गदर्शकांना टोक्योला पाठवण्याचे धोरण आखले आहे. यात प्रशिक्षक, डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे. क्रीडापटू, प्रशिक्षक आणि साहाय्यक मार्गदर्शक यांच्याशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीला शिष्टाचाराची आवश्यकता असेल, तरच ऑलिम्पिकसाठी पाठवण्यात येईल,’’ असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रेक्षकांचा निर्णय प्रलंबित

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांच्या हजेरीचा निर्णय अद्याप प्रलंबित असून, महिन्याअखेपर्यंत तो घेण्यात येणार आहे. ऑलिम्पिकला २३ जुलैपासून प्रारंभ होणार असून, परदेशातील प्रेक्षकांवर आधीच बंदी घालण्यात आल्यामुळे ही स्पर्धा चाहत्यांना दूरचित्रवाणीवरच पाहता येणार आहे.

१९० टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारताचे पथक १९० सदस्यांचे असण्याची शक्यता आहे. यात १०० हून अधिक क्रीडापटूंचा समावेश असेल.

१२ बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, कुस्ती, नौकानयन, अ‍ॅथलेटिक्स, तिरंदाजी, अश्वारोहण, तलवारबाजी, शिडांच्या नौकांची स्पर्धा (सेलिंग), नेमबाजी आणि टेबल टेनिस अशा १२ क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय क्रीडापटू पात्र ठरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 11:04 pm

Web Title: tokyo olympics sports ministry not to send its delegation to olympics zws 70
टॅग : Tokyo Olympics 2020
Next Stories
1 Euro cup 2020: रशियाचा फुटबॉलपटू मोस्तोवोय याला करोनाची लागण झाल्याने स्पर्धेतून बाहेर
2 Euro cup 2020: स्पर्धेपूर्वी संपूर्ण स्पेन संघाचं करोना लसीकरण
3 Sagar Rana Murder Case: सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 
Just Now!
X