भारतीय महिला टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने उत्कृष्ट खेळ करत टोक्यो ऑलिम्पिकच्या एकेरीच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या दोन गेममध्ये मागे पडल्यानंतर तिने खडतर सामन्यात युक्रेनच्या मार्गारिटा पेसोत्स्काला ४-३ने हरवत नेत्रदीपक पुनरागमन केले. लय शोधण्यात मनिकाला थोडा त्रास झाला, पण ५७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात ती २०व्या क्रमांकाच्या युक्रेनियन खेळाडूवर ४-११, ४-११, ११-७, १२-१०, ८-११, ११-५, ११-७ अशी सरशी साधण्यात यशस्वी ठरली. मनिकावर दबाव असूनही तिने संघर्ष करत सामन्यावर उत्कृष्ट नियंत्रण राखले. मनिकाचे कमबॅक पाहून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत तिला शाबासकी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

प्रशिक्षकांशिवाय उतरली मैदानात

या सामन्यात मनिका बत्रा तिच्या प्रशिक्षकांशिवाय उतरली होती. तिच्या खासगी प्रशिक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मनिकाने निषेध म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांचे मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता.

मनिका बत्राचे खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांना वादग्रस्तपणे तिच्याबरोबर टोक्योला  जाण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु तिला स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राष्ट्रीय संघासह राहण्याची परवानगी नव्हती. ती हॉटेलमध्ये राहत आहे आणि तिला सराव करण्यासाठीच परवानगी आहे.

हेही वाचा – Tokyo 2020 : ऑलिम्पिकची तयारी सोडून झाला करोनायोद्धा, तरीही जिंकलं सुवर्णपदक!

२६ वर्षीय मनिकाला प्रशिक्षकाची मान्यता ‘अपग्रेड’ करायची होती, जेणेकरून ती तिच्या सामन्यादरम्यान प्रशिक्षकांनाही कोर्टात आणू शकेल. परंतु टीमचे प्रमुख एम. पी. सिंग यांनी सांगितले, की मनिकाच्या प्रशिक्षकांना कोर्टावर घेऊन येण्याची परवानगी आयोजकांनी फेटाळून लावली आहे. एम. पी. सिंग हे टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची सल्लागार आहेत आणि सध्या ते टोक्योमध्ये आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics table tennis player manika batra refuses to take help of national coach adn
First published on: 25-07-2021 at 17:36 IST