News Flash

Tokyo Paralympics : नेमबाजीत भारताचा डबल धमाका; मनीष नरवालला सुवर्ण तर सिंहराजची रौप्य पदकाची कमाई

मनीषने २१८.२ च्या एकूण गुणांसह प्रथम स्थान मिळवले तर सिंगराजने २१६.७ च्या एकूण गुणांसह द्वितीय स्थान मिळवले.

Tokyo Paralympics Shooting P4 Mixed 50m Pistol SH1 Manish Narwal wins gold Singhraj silver

टोक्यो पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी शनिवार हा अतिशय खास दिवस आहे. भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी४ मिश्रित ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले आहे. पात्रता फेरीत, सिंहराज ५३६ गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. यासह, भारताच्या पदकांची संख्या १५ झाली आहे. ज्यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या पॅरालिम्पिकमध्ये ३९ वर्षीय सिंहराजला दुसरे पदक मिळाले. यापूर्वी त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

१९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. दुसरीकडे, एस मीटर एयर पिस्तूल एसएच1 स्पर्धेत मंगळवारी कांस्य जिंकणाऱ्या सिंगराजने २१६.७ गुणांसह रौप्य पदक जिंकले. रशियन ऑलिम्पिक समितीचे सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत सिंगराज अदाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. भारताच्या आकाशने २७ वे स्थान मिळवून अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.

हे दोन्ही पॅरा नेमबाज फरिदाबादचे पराभूत आहेत. यासोबत १९ वर्षीय मनीष नरवालने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी अवनी लाखेरा (महिला 10 मीटर एअर रायफल एसए१) आणि सुमित अँटिल (पुरुष भाला फेक एफ६४) यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत.

Tokyo Paralympics : बॅडमिंटनमध्ये भारताचे पदक निश्चित; प्रमोद भगत सुवर्ण जिंकण्यापासून एक पाऊल दूर

दरम्यान, टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांनी अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएल ३ वर्ग उपांत्य फेरीत प्रमोद भगत यांनी जपानच्या फुजीहाराचा २-० असा पराभव केला. प्रमोद भगत यांनी उपांत्य फेरीचा सामना २१-११, २१-१६ असा जिंकला. आत्तापर्यंत कोणताही भारतीय खेळाडू ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिक खेळांमध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकू शकलेला नाही. प्रमोद यांना बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिले सुवर्ण जिंकण्याची संधी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 9:39 am

Web Title: tokyo paralympics shooting p4 mixed 50m pistol sh1 manish narwal wins gold singhraj silver abn 97
Next Stories
1 Tokyo Paralympics : बॅडमिंटनमध्ये भारताचे पदक निश्चित; प्रमोद भगत सुवर्ण जिंकण्यापासून एक पाऊल दूर
2 पिछाडीनंतर दिलासा
3 शतकवीर माजी क्रिकेटपटू रघुनाथ चांदोरकर यांचे निधन
Just Now!
X