News Flash

भोसले क्रिकेट अकादमीला विजेतेपद

टोटल चषक क्रिकेट स्पर्धा

भोसले क्रिकेट अकादमीला विजेतेपद
टोटल चषक विजेता भोसले क्रिकेट अकादमीचा संघ. सोबत राज्याचे क्रीडा अधिकारी एन. बी. मोटे, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, संजय पाटील.

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन आयोजित टोटल चषक १२ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत भोसले क्रिकेट अकादमीने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी हिंद्कला क्रिकेट क्लबवर १८ धावांनी विजय मिळवला. तीर्थ वनारसे (४९ धावा) हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

विजेत्यांना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी निवड समितीचे संजय पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी वेंगसरकर म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या क्लबसाठी खेळता त्यांच्याशी एकनिष्ठ राहा. कारण हल्ली पालकच मुलांचे क्लब बदलण्याचे उपद्व्याप करीत असतात. पण तुम्ही जर आपल्या कामगिरीत सातत्य राखलेत व आपली कामगिरी उंचावत नेलीत तर निवड समितीला तुमच्या नावाची दखल घ्यावीच लागेल.’’

संक्षिप्त धावफलक

भोसले क्रिकेट अकादमी : २१ षटकांत ५ बाद १२२ (तीर्थ वनारसे ४९, आर्य कारले नाबाद ३१) विजयी वि. हिंद्कला क्रिकेट क्लब : २१ षटकांत ८ बाद १०४ (अभिनव शाह २०, आर्य गायकवाड २०; संचित कदम २१/३), सामनावीर : तीर्थ वनारसे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 1:44 am

Web Title: total cup cricket tournament bhosale cricket academy a winner abn 97
Next Stories
1 प्रशिक्षकाला शिवीगाळ करणाऱ्या दिंडाची हकालपट्टी
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा डाव ११४ धावांत कोसळला
3 नव्याने संघबांधणीचे आफ्रिकेपुढे आव्हान
Just Now!
X