News Flash

युरोपा लीग फुटबॉल : टॉटनहॅम, एसी मिलान बाद फेरीत

‘एच’ गटात लिली ११ गुणांसह आघाडीवर असून त्या गटामध्येच मिलान १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

गॅरेथ बेल

लंडन : टॉटनहॅम आणि एसी मिलान यांनी युरोपा लीग फुटबॉलची बाद फेरी गाठली. या अव्वल संघांव्यतिरिक्त स्पर्धेतील एकूण १२ संघांनी आगेकूच केली.

एसी मिलानने दोन गोलांची पिछाडी भरून काढत सेल्टिक एफसीवर ४-२ असा विजय मिळवला. सेल्टिकने १४व्या मिनिटालाच २-० आघाडी घेतली होती. मात्र ही पिछाडी एसी मिलानने दोन मिनिटांत दोन गोल करत भरून काढली. त्यापाठोपाठ दुसऱ्या सत्रात दोन गोल करत एसी मिलानने विजय मिळवला. ‘एच’ गटात लिली ११ गुणांसह आघाडीवर असून त्या गटामध्येच मिलान १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

अन्य संघांमध्ये ब्रागा, लिली, व्हिलारेयाल, रॉयल अँटवर्प, डायनामो झ्ॉग्रेब, रेड स्टार बेलग्रेड, लेव्हरकु सेन, स्लॅविया प्राग, रेंजर्स, बेनफिका, ग्रेनडा आणि पीएसव्ही इन्धोवेन यांनी गटवार साखळीतील एक लढत बाकी ठेवत बाद फेरी गाठली.

टॉटनहॅमला बाद फेरी गाठण्यासाठी एक गुण पुरेसा होता. त्याप्रमाणे लास्कविरुद्धची त्यांची लढत ३-३ अशी बरोबरीत संपली. गॅरेथ बेलने रेयाल माद्रिदकडून टॉटनहॅमकडे परतल्यावर युरोपा लीगमधील पहिला गोल या लढतीद्वारे नोंदवला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:34 am

Web Title: tottenham ac milan reach knockout stage of europa league zws 70
Next Stories
1 करोनामुक्त नरसिंहचा विश्वचषक संघात समावेश
2 बॉक्सिंग निवडणुकीच्या रिंगणात आशीष शेलार!
3 टीम इंडियाला मोठा धक्का, रविंद्र जाडेजा टी-२० मालिकेतून बाहेर
Just Now!
X