29 October 2020

News Flash

इंग्लिश प्रीमिअर फुटबॉल लीग : टोटनहमची जेतेपदाकडे कूच

टोटनहम हॉटस्पूर क्लबने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत मंगळवारी स्टोक सिटीवर ४-० असा विजय मिळवला.

| April 20, 2016 03:50 am

टोटनहम हॉटस्पूर क्लबने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत मंगळवारी स्टोक सिटीवर ४-० असा विजय मिळवला.

केन, अलीचे प्रत्येकी दोन गोल; स्टोक सिटीवर ४-० असा विजय
विजयवीर हॅरी केन आणि डेले अली यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर टोटनहम हॉटस्पूर क्लबने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत मंगळवारी स्टोक सिटीवर ४-० असा विजय मिळवला. या विजयाबरोबर टोटनहमने जेतेपदाच्या दिशेने कूच केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या लिस्टर सिटीवर दडपण कायम राखले आहे. ७३ गुणांसह लिस्टर पहिल्या स्थानावर असून टोटनहम ६८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही क्लबचे चार सामने शिल्लक असून त्यांच्या जेतेपदाची चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. टोटनहम १९६०नंतरचा लीग अजिंक्यपद स्पध्रेचा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्नात आहे.
प्रमुख खेळाडू केन याने ९व्या मिनिटाला टोटनहमला आघाडी मिळवून दिली. या आघाडीबरोबर टोटनहमने मध्यंतरापर्यंत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती.
दुसऱ्या सत्रात अलीने ६७व्या मिनिटाला त्यात भर घातली. अवघ्या तीन मिनिटांत केनकडून पुन्हा एक अप्रतिम गोल झाला आणि टोटनहमची आघाडी ३-० अशी मजबूत झाली. सामन्याच्या अखेरच्या क्षणाला अलीच्या गोलने टोटनहमचा ४-० असा विजय निश्चित केला. ईपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक २४ गोल केनच्या नावावर झाले आहेत. तसेच सर्वाधिक गोल करणाऱ्या क्लबमध्येही टोटनहमने आघाडी घेतली आहे. ६३ गोलसह ते अव्वल स्थानावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:50 am

Web Title: tottenham hotspur beat stoke city in english premier football league
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला उज्ज्वल भवितव्य – नरहर कुंदर
2 मॉस्कोच्या तयारीवर फिफा अध्यक्ष संतुष्ट
3 ऑलिम्पिक पात्रतेसाठी वेटलिफ्टिंगपटू सज्ज
Just Now!
X