पहिल्या लढतीतील विजयामुळे उपांत्य फेरीत आगेकूच

मँचेस्टर : रहीम स्टर्लिगच्या दोन गोलमुळे मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात घरच्या मैदानावर टॉटेनहॅम हॉटस्परविरुद्धच्या सामन्यात ४-३ असा विजय मिळवला. मात्र पहिल्या सामन्यातील १-० अशा पराभवामुळे ४-४ अशा एकूण गोलसंख्येनंतरही टॉटेनहॅमने मँचेस्टर सिटीचा विजयरथ रोखत उपांत्य फेरीत मजल मारली.

टॉटेनहॅमने प्रतिस्पध्र्याच्या मैदानावर केलेल्या अधिक गोलमुळे त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले. पहिल्या ११ मिनिटांतच तब्बल चार गोल या सामन्यात नोंदवले गेले. रहीम स्टर्लिग (चौथ्या मिनिटाला) आणि बर्नाडरे सिल्वा (११व्या मिनिटाला) यांनी मँचेस्टर सिटीसाठी गोल झळकावल्यानंतर लिव्हरपूलच्या सन हेऊंग-मिन यानेही सातव्या आणि दहाव्या मिनिटाला गोल करत त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले.

स्टर्लिग (२१व्या मिनिटाला) आणि सर्जियो अ‍ॅग्युरो (५९व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने ४-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेत उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली. मात्र सामना संपायला १७ मिनिटे शिल्लक असताना फर्नाडो लॉरेन्टोने केलेला वादग्रस्त गोल टॉटेनहॅम हॉटस्परला उपांत्य फेरीत स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण ठरला. स्पेनच्या फर्नाडोने गोल करताना हाताचा वापर केला आहे की नाही, हे पाहण्यासाठी ‘व्हीएआर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत स्टर्लिगने आपली हॅट्ट्रिक साजरी केली. मात्र अ‍ॅग्युरो ‘ऑफ-साइड’ असल्यामुळे पुन्हा एकदा ‘व्हीएआर’ तंत्रज्ञान टॉटेनहॅमसाठी धावून आले. आता टॉटेनहॅमला उपांत्य फेरीत आयक्सशी सामना करावा लागेल.

उपांत्य फेरीचे वेळापत्रक : टॉटेनहॅम वि. आयक्स १ मे आणि ८ मे

लिव्हरपूल वि. बार्सिलोना १ मे आणि ८ मे

सन हेऊंग-मिन