24 September 2020

News Flash

IPL 2020 : स्पर्धा सुरु होण्याआधीच पंजाब, राजस्थान, हैदराबाद संघांना फटका; ३ खेळाडू जाणार संघाबाहेर

गव्हर्निंग काऊन्सिलचा 'तो' निर्णय तिन्ही संघांसाठी डोकेदुखी

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन वेळा स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचा तेरावा हंगाम अखेरीस युएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. भारत सरकारने या स्पर्धेसाठी बीसीसीआयला तत्वतः मान्यता दिल्याचं कळतंय. करोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्व खेळाडूंना आरोग्यविषयक सर्व नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करावं लागणार आहे. यात क्वारंटाइन कालावधीपासून, Bio Security bubble न तोडण्याचं बंधनही खेळाडूंवर असणार आहे. गव्हर्निंग काऊन्सिलने यासाठीची मार्गदर्शक तत्व सर्व संघमालकांना दिली आहेत.

या मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रत्येक संघाला आपल्यासोबत फक्त २४ खेळाडूच सोबत नेता येणार आहेत. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूमध्ये करोनाची लक्षणं आढळली तर त्यासाठी COVID replacement ची सोय करण्यात आली आहे. परंतू फक्त २४ खेळाडूंचा नियम राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनराईजर्स हैदराबाद या संघांसाठी मारक ठरणार आहे. २०२० च्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावानंतर तिन्ही संघांकडे सध्या २५ खेळाडू आहेत. त्यामुळे स्पर्धेला जाण्याआधी तिन्ही संघांना आपल्या एका खेळाडूला बसवावं लागणार आहे. त्यामुळे गव्हर्निंग काऊन्सिलचा हा निर्णय तिन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

जाणून घेऊयात तिन्ही संघातील खेळाडूंची नावं –

राजस्थान रॉयल्स :

फलंदाज – महिपाल लोमरोर, मनन व्होरा, रियान पराग, स्टिव्ह स्मिथ, रॉबीन उथप्पा , डेव्हिड मिलर

गोलंदाज – अंकित राजपूत, मयांक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, वरुण अरॉन, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, अक्ष सिंह, ओश्ने थॉमस, अँड्रू टाय

अष्टपैलू – बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शशांक सिंह, यशस्वी जैस्वाल, अनिरुद्ध जोशी, टॉम करन

यष्टीरक्षक – जोस बटलर, संजू सॅमसन, अनुज रावत

———————————————————————————
सनराईजर्स हैदराबाद :

केन विल्यमसन, डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडे, विराट सिंग, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिचेल मार्श, फॅबिअन अ‍ॅलेन, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, संजय यादव, जॉनी बेअरस्टो, वृद्धीमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बी. संदीप, बसिल थम्पी
———————————————————————————-

किंग्ज इलेव्हन पंजाब :

फलंदाज – ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, करूण नायर, सर्फराज खान, मनदीप सिंग

गोलंदाज – शेल्डन कोट्रेल, इशान पोरेल, रवी बिश्नोई , मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्षदीप सिंग, हार्डस विलजोन, एम अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे

अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल, जिमी निशम, ख्रिस जॉर्डन, तरजींदर ढिल्लन, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा

यष्टिरक्षक – लोकेश राहुल, निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:01 pm

Web Title: tough decision coming up for three ipl teams under the new 24 players rule psd 91
Next Stories
1 इंग्लंडचा भारत दौरा पुढे ढकलला
2 अमिरातीत ‘आयपीएल’ला सरकारची तत्त्वत: मान्यता
3 युरोपा लीग फुटबॉल : सेव्हिया, वोल्व्हस उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X