News Flash

चौथ्या फेरीत आनंदची गाठ नाकामुराशी

बल्गेरियाच्या व्हेसेलिन तोपालोव्हविरुद्ध मिळविलेल्या विजयानंतर भारताच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा आत्मविश्वास दुणावला आहे. ‘नॉर्वे बुद्धिबळ-२०१३’ स्पध्रेच्या चौथ्या फेरीत आनंदची गाठ पडणार आहे ती अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी.

| May 13, 2013 12:43 pm

बल्गेरियाच्या व्हेसेलिन तोपालोव्हविरुद्ध मिळविलेल्या विजयानंतर भारताच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा आत्मविश्वास दुणावला आहे. ‘नॉर्वे बुद्धिबळ-२०१३’ स्पध्रेच्या चौथ्या फेरीत आनंदची गाठ पडणार आहे ती अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी. आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये आनंदच्या खात्यावर दोन गुण जमा आहेत. पहिल्या फेरीत आनंदने अर्मेनियाच्या लिव्हॉन अरोनियनविरुद्धची लढत सहजगत्या अनिर्णीत राखली. त्यानंतर आगामी जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील प्रतिस्पर्धी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धची लढत बरोबरीत सोडूवन आनंदने मानसिकदृष्टय़ा विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2013 12:43 pm

Web Title: tough rounds over viswanathan anand looks to consolidate
टॅग : Chess,Viswanathan Anand
Next Stories
1 आशियाई चषकासाठी भारतीय महिला फुटबॉल संघ जाहीर
2 मला सोनं खरेदी करायला आवडतं – सचिन तेंडुलकर
3 वॉटसनचा हल्लाबोल!
Just Now!
X