23 September 2020

News Flash

क्रीडाविश्वात खळबळ! क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या

मृतदेहाजवळ कोणतीही 'सुसाईट नोट' सापडली नसल्याची माहिती

प्रातिनिधीक फोटो

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेला तीन-चार दिवस झाले असतानाच क्रीडाविश्वातून एक खळबळजनक बातमी आली आहे. त्रिपूराच्या १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी अयांती रेंग हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्रिपुरा येथील स्थानिक वृत्तपत्र असलेल्या ‘स्यांदन’ने हे वृत्त दिले.

‘स्यांदन’ने दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अयंतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. मंगळवारी तिच्या खोलीत तिचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही ‘सुसाईट नोट’ सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

चार भावंडांमध्ये अयांती ही सर्वात लहान होती. गेल्या वर्षी तिला त्रिपुराच्या १९ वर्षाखालील संघात स्थान मिळाले होते. तिने राज्यस्तरीय २३ वर्षाखालील टी-२० स्पर्धेतही संघाचे प्रतिधित्व केले होते. त्रिपुराची राजधानी असलेल्या अगरतालापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या उदयपूर येथील ती रहात होती.

त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या सचिव तैमीर चंदा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली. “अयंतीच्या निधनाचे वृत्त समजल्याने धक्का बसला आहे. आम्ही एक चांगली युवा क्रिकेटपटू गमावली. ती १६ वर्षाखालील संघाची सदस्य होती. अयंती कोणत्याही तणावाखाली नव्हती. काही दिवसांपूर्वी ती राज्य क्रिकेट संघासोबत खेळत होती. ती १६ दिवस आमच्या सोबत होती आणि अगदी आनंदी होती. लॉकडाऊनमुळे आम्ही सर्व जण एकत्रच होतो. त्यानंतर आम्ही काही ऑनलाइन कोर्सदेखील केले. मात्र तिला कौटुंबिक स्तरावर काही समस्या असल्यास त्याची कल्पना नाही”, असे चंदा म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 6:19 pm

Web Title: tripura u 19 woman cricketer ayanti reang found dead commits suicide vjb 91
Next Stories
1 शहीद जवानांबाबत वादग्रस्त ट्विट; CSK ने केलं डॉक्टरचं निलंबन
2 India China Face Off : भारतीय जवानांच्या बलिदानाला विराटचा सलाम!
3 “…म्हणून विराटपेक्षा धोनी गोलंदाजांचा लाडका”
Just Now!
X