News Flash

फुटबॉलपटूकडून स्वतःच्या मुलाची हत्या, करोना झाल्याच्या संशयातून केलं कृत्य

हत्येनंतर स्वतः पोलिसांना गेला शरण

सध्या संपूर्ण जगाला करोना विषाणूने ग्रासलं आहे. जगभरात आतापर्यंत लाखो लोकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र टर्कीमध्ये माजी फुटबॉलपटूने आपल्या मुलाला करोना झाल्याच्या संशयावरुन त्याची हत्या केली आहे. च्येफर टोकटाश असं या खेळाडूचं नाव असून हे कृत्य केल्यानंतर त्याने पोलिसांकडे आत्पसमर्पण केलं आहे. च्येफरचा ५ वर्षीय मुलगा कासिमवर सरकारी रुग्णालयात करोनासंदर्भात उपचार सुरु होते.

मात्र आपल्या मुलाला या भीषण रोगाची लागण झाल्याच्या भीतीनेच च्येफरने आपल्या मुलाची हत्या केली. महत्वाची गोष्ट म्हणजे उपचार घेत असलेल्या ५ वर्षीय कासिमचा अहवाल आल्यानंतर त्याला करोनाची लागण झालेली नसल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात च्येफरला अटक केली आहे. २३ एप्रिल रोजी च्येफरचा मुलगा कासिमला खोकला आणि तापाचा त्रास सुरु झाला होता. टर्कीमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, च्येफरने आपल्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवत त्याची हत्या केली. २००७ ते २००९ काळात च्येफर Hacettepe soccer या टर्कीमधील प्रसिद्ध संघाकडून खेळत होता. मात्र निवृत्तीनंतर तो स्थानिक संघांकडून खेळत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 6:09 pm

Web Title: turkish footballer confesses to killing son who was in hospital with suspected covid 19 psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 युवराजने उडवली ग्रेग चॅपल यांची खिल्ली
2 “…त्यानंतर विराट परत माझ्या नादी लागला नाही”
3 सरकारने परवानगी दिल्यास १८ मे पासून खेळाडू सराव करु शकतात – BCCI
Just Now!
X