बांगलादेशविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विंडीजविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत ICC ने मोठा बदल करण्याचं ठरवलं आहे.

अवश्य वाचा –  विंडीजच्या भारत दौऱ्यात महत्वपूर्ण बदल, जाणून घ्या…

नुकत्यात पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात मैदानावरील पंचांनी तब्बल २१ नो-बॉलचे निर्णय दिलेच नाहीत. ज्यामुळे पंचांच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यामुळे आगामी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेत, तिसरे पंच नो-बॉलचा निर्णय देणार आहेत. ICC मधील सुत्रांनी हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राला माहिती दिली.

अवश्य वाचा – विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन

याआधी २०१९ आयपीएल हंगामात अशाच प्रकारे पंच एस.रवी यांनी नो-बॉलचा निर्णय दिलाच नव्हता. ज्यानंतर आयसीसीने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. प्रदीर्घ काळ झालेल्या चर्चेनंतर आयसीसीने नवीन नियम आखताना तिसऱ्या पंचांकडे नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी सोपवली होती. या नवीन निर्णयाची अंमलबजावणी आता भारत विरुद्ध विंडीज मालिकेत होणार असल्याचं समजतंय.