न्यूझीलंड संघाचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्लुमने कर्णधारी खेळी करत इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात संघाला पाच धावांनी विजय मिळवून दिला. सामन्यात मॅक्क्लुमने तडफदार फलंदाजी करत ४८ चेंडूत ६८ धावा ठोकल्या. रविवारी चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यातही इंग्लंडला जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. परंतु, भारताच्या उत्तम सांघिक कामगिरीमुळे इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सामन्यात इंग्लंडचा पाच धावांनी पराभव झाला. त्यानंतर मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या या टी-२० सामन्यातही शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. चेंडूचा सामना करत होता रवि बोपारा, पण त्याला षटकार मारणे काही जमले नाही आणि इंग्लंडचा पाच धावांनी पराभव झाला.