आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये महिला आणि पुरूष दोन्ही गटांत भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकून विजयादशमी साजरी केली आहे.
महिला कबड्डीने संघाने अंतिम सामन्यात इराणला ३१-२१ अशी मात देत सुवर्ण पदकावर कब्जा केला, तर त्यापाठोपाठ भारताच्या पुरूष गटानेही २७-२५ अशा चुरशीच्या लढतीत इरणावर विजय प्राप्त केला. या दोन्ही विजयांसह भारताच्या खात्यात आता एकूण ११ सुवर्णपदकांसह एकूण ५७ पदकांची कमाई झाली आहे. याआधी गुरूवारी भारताच्या पुरूष हॉकी संघाने पाकिस्तानवर पेनल्टी शुटआऊटमध्ये ४-२ अशी मात करून नवा इतिहास रचला आणि तब्बल १६ वर्षांपासूनचा हॉकीतील सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला.