महेंद्रसिंग धोनी या दोनच शब्दांची सध्या ट्विटवर चर्चा सुरु आहे. या चर्चेमागील कारण आहे भारताने ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलाच मालिका विजय. धोनी तीन सामन्यांच्या मालिकेमधील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळून देईपर्यंत घट्ट पाय रोवून उभा राहिला आणि सामना जिंकवूनच तंबूत नाबाद परतला. आजच्या मालिकेतील शेवटच्या समान्यामध्ये धोनीने ८७ तर केदार जाधवने ६१ धावांची खेळी केली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. शेवटच्या दोन्ही सामन्यात भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. धोनीच्या याच कामगिरीवर नेटकरी फिदा झाले असून अनेकांनी धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पाहुयात कशाप्रकारे या मालिका विजयाला धोनी टच असल्याने नेटकरी झाले आहेत सैराट…

भन्नाट विजय: हरभजन सिंग

दोघांच्या संयमी खेळी दाद: लक्ष्मण

या विजयातून काय मिळाले: हर्षा बोगले

त्याची बॅटच बोलते: कैफ

लता मंगेशकरांकडून धोनीला खास शुभेच्छा…

वा काय गणित आहे

धोनी हेटर्ससाठी

शांत बसा आणि खेळ पाहा

धावांचा पाठलाग करताना सरासरी शंभरहून अधिक

तो संघात का असा प्रश्न काहींनी विचारला होता

किप काम से काम

तो नाही त्याची बॅट बोलते

बोललेलो ना परत येणार

नाही

इथेही #10YearChallenge

त्यांना नेट प्रॅक्टीस वाटली

धोनीचा झेल सोडला सामना सोडला

भारताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर एकही मालिका गामावलेली नाही. भारताने टी-२० मालिकेत १-१ची बरोबरी साधली, एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली तर कसोटी मालिकाही भारताने २-१ च्या फरकाने जिंकली.