News Flash

‘मेस्सी जैसा कोई नहीं’ चाहत्यांकडून रोनाल्डोचं ट्रोलिंग

मेस्सीची नक्कल करणे रोनाल्डोला महागात पडले

मेस्सी आणि रोनाल्डो (सोशल मीडिया)

फुटबॉलची भारतामध्ये म्हणावी तशी क्रेझ नसली तरी मेस्सी आणि रोनाल्डो या खेळाडूंनी जगभरातील फुटबॉल चाहत्यांसह भारताततही आपला विशेष चाहता वर्ग निर्माण केलाय. आता मेस्सी भारी की रोनाल्डो अशी तुलना करायची म्हटलं तर ते योग्य ठरणार नाही. मात्र फुटबॉल चाहत्यांमध्ये मेस्सी हा रोनाल्डोपेक्षा ग्रेट असल्याचे दिसतंय. कारण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात रोनाल्डोने मेस्सीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रकारामुळे मैदानात पंचानी त्याला रेड कार्ड तर दाखवलेच शिवाय चाहत्यांनीही त्याला ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली. रिअल माद्रिदचा सुपरस्टार क्रिस्टिनो रोनाल्डोने स्पॅनिश सुपर लीग स्पर्धेत टी-शर्ट काढून मेस्सी सारखा आनंद व्यक्त केला. त्याच्या या आनंदावर पहिल्यांदा पंचानी विरजण घातले. त्याला या कृत्याबद्दल रेड कार्ड दाखविण्यात आले. त्यानंतर फुटबॉल चाहत्यांकडून रोनाल्डापेक्षा मेस्सीच भारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली.

एका नेटिझनने मेस्सी आणि रोनाल्डो दोघांचा फोटो शेअर केला असून सॉरी रोनाल्डो पण तुझ्यापेक्षा मेस्सीची अॅक्शनच भारी होती, अशा आशयाचे ट्विट केलंय. या फोटोमध्ये मेस्सी हा आनंद व्यक्त करताना १० क्रमांकाचा टी-शर्ट उंचावून चाहत्यांना दाखवताना दिसतोय. एका नेटिझनने तर मेस्सीच्या आनंद व्यक्त करण्याच्या शैलीला ‘ओरिजनल’ तर रोनाल्डोने केलेली मेस्सीची नक्कल म्हणजे ‘चायना मेड’ आहे, असे ट्विट केलंय. खुद्द रोनाल्डने मेस्सीची नक्कल केल्याचे कबुलही केलंय. तो सामन्यानंतर म्हणाला की, ‘मी मैदानात आनंद व्यक्त करताना मेस्सीच्या अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. पण मला रेड कार्ड दाखवण्यात आलं.’ एकूणच मैदानावर चांगल्या खेळीनंतर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी रोनाल्डने केलेला प्रयत्न फसलाय म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 12:38 pm

Web Title: twitter explodes cristiano ronaldo recreates lionel messis shirt celebration
Next Stories
1 गावसकरांच्या ‘या’ मताशी तुम्ही सहमत आहात का?
2 मिशन श्रीलंका फत्ते!! कसोटी मालिका ३-० ने भारताच्या खिशात
3 अधुरी एक कहाणी!