इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्यामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. अशा परिस्थितीत तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडल आणि वेबसाइटवर स्टोक्सविषयी माहिती दिली. ईसीबीने असेही म्हटले, ”आम्ही स्टोक्सच्या निर्णयाचा आदर करतो आणि आम्ही त्याला आवश्यक वेळ देऊ. आम्ही त्याला इंग्लंडकडून परत खेळताना पाहण्यास उत्सुक आहोत.” बेन स्टोक्सच्या या मोठ्या निर्णयानंतर ट्विटरवर प्रचंड प्रतिक्रिया आल्या.

सोमरसेटचा क्रेग ओव्हरटन बेन स्टोक्सची जागा घेईल. बेन आणि त्याच्या कुटुंबाला या काळात गोपनीयता देण्यात यावी, अशी ईसीबीने सर्वांना विनंती केली आहे.

 

हेही वाचा – Tokyo 2020 : भारताला मोठा धक्का, दिग्गज बॉक्सर पराभूत

स्टोक्सच्या निर्णयानंतर ट्विटरवर आलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

चार ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बेन स्टोक्सव्यतिरिक्त जलदगती गोलंदाज ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर देखील खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी काही प्रमाणात कमकुवत झाल्याचे दिसते.