09 March 2021

News Flash

भारतीय संघाच्या निवडीवर काय म्हणाले ट्विटरकर..

नेटिझन्सनी रोहीत शर्माच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

रोहीत शर्माचा भारतीय खेळपट्ट्यांवरील फॉर्म चांगला असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी संभाव्य १५ खेळाडूंची यादी जाहीर केली. संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आले नसून, रोहीत शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहीत शर्माचा भारतीय खेळपट्ट्यांवरील फॉर्म चांगला असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. संदीप पाटील यांनीही यावेळी रोहीतच्या निवडीची समर्थन केले.

वाचा: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात बदल नाही, रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. काहींनी रोहीत शर्माच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, रोहीतच्या जागी गौतम गंभीरची निवड होणे अपेक्षित होते, असे म्हटले आहे. शिखर धवनच्या निवडीवर देखील काही नेटिझन्सनी आक्षेप नोंदवला आहे. एका नेटिझनने रविंद्र जडेजाचे एक छायाचित्र ट्विट केले असून, आपली निवड झाल्याचे जडेजाला कळल्यानंतर त्याची प्रतिक्रिया कशी असेल यावरून खिल्ली उडवली आहे. स्टुअर्ट बिन्नीला संघातून वगळण्यात आल्याबद्दल देखील काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. घरच्या मैदानात होणाऱया सामन्यांसाठी बिन्नीला संघात स्थान देण्यात आले नाही, मग वेस्ट इंडिज दौऱयासाठी तरी त्याची निवड का करण्यात आली होती? असा सवाल नेटिझन्सनी विचारला आहे.

Next Stories
1 न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्माचा समावेश, बिन्नीला डच्चू
2 वॉवरिन्काला अमेरिकन ओपनचे पहिल्यांदाच विजेतेपद
3 मुंबईकर नयनचे दमदार पुनरागमन
Just Now!
X