News Flash

दिल्लीत सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये दोन खेळाडू आढळले करोना पॉझिटिव्ह!

300हून अधिक नेमबाजपटूंचा वर्ल्डकपमध्ये सहभाग

दिल्लीच्या डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत दोन भारतीय खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या नेमबाजपटूंच्या प्रशिक्षकाने यासंदर्भात माहिती दिली. करोनाची लागण झालेल्या या खेळाडूंची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत.

हे प्रशिक्षक म्हणाले, ”भारताचे दोन आघाडीचे नेमबाजपटू या स्पर्धेत करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दोघांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला समोर ठेऊन नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने 57 नेमबाजांची मोठी तुकडी मैदानात उतरवली होती. यात 15 नेमबाजपटूंनी ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.

प्रशिक्षकांचा हॉटेल व्यवस्थापनावर आरोप

भारतीय संघाच्या संबंधित प्रशिक्षकांनी हॉटेल व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “हॉटेलमध्ये काही लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नाहीत. याव्यतिरिक्त, हॉटेलमध्ये काही खासगी कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या नेमबाजपटूंना बायो-बबल उल्लंघनाचा संपूर्ण धोका आहे.”

या स्पर्धेत युरोपचा आघाडीचा नेमबाजपटू गुरुवारी करोना पॉझिटिव्ह आढळला होता. संक्रमण झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे तो वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. स्पर्धेतील तिन्ही विभागांमध्ये म्हणजे रायफल, पिस्तूल आणि शॉटगनमध्ये 40हून अधिक देशांचे 300हून अधिक नेमबाजपटू सहभागी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 2:50 pm

Web Title: two indian shooters found corona positive in delhi world cup adn 96
Next Stories
1 Video: पहिल्याच चेंडूवर आर्चरला षटकार ठोकण्याची हिंमत कुठून आली?, सूर्यकुमारने सांगितलं ‘सिक्रेट’
2 Ind vs Eng : ‘स्पेशलिस्ट’ गोलंदाज परतला, निर्णायक सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
3 लक्ष्यचे आव्हान संपुष्टात