22 October 2020

News Flash

दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण

खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा क्रिकेट बोर्डाचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आयोजित करण्यात आलेल्या कँपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीयेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने या दोन्ही खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त ESPNCricinfo ने दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून ५० जणांची चाचणी केली होती. ज्या चाचणीत दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं समजतंय.

करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन्ही खेळाडूंना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आलेलं असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वर्णद्वेशावरुन आफ्रिन खेळाडूंमध्ये सुरु झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंसाठी एका सांस्कृतिक कँपचं आयोजन केलं होतं. २२ ऑगस्टपर्यंत हा कँप सुरु राहणार आहे. मात्र या खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा निर्णय आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 3:32 pm

Web Title: two south africa players test positive for covid 19 psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 सचिन, विराटसाठी बॅट बनवणारे अश्रफ भाईं अडचणीत, आजारपण आणि आर्थिक परिस्थितीशी झुंज
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोनीला लिहिलं खास पत्र, म्हणाले…
3 IPL 2020 : युजवेंद्र चहलने सांगितलं RCB च्या खराब कामगिरीचं कारण…
Just Now!
X