12 August 2020

News Flash

टायसन फ्युरी नवा विश्वविजेता

ब्रिटनच्या टायसन फ्युरीने विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद आपल्या नावावर केले.

ब्रिटनचा टायसन फ्युरी

वाल्दीमिर क्लित्सच्कोचा अकरा वर्षांचा अपराजित राहण्याचा विक्रम मोडीत काढताना ब्रिटनच्या टायसन फ्युरीने विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद आपल्या नावावर केले. २७ वर्षीय फ्युरीने डसेल्डरेफ येथे झालेल्या सामन्यात ११५-११२, ११५-११२ व ११६-१११ अशी बाजी मारली. डब्लूबीए, आयबीएफ, आयबीओ आणि डब्लूबीओ अशी जेतेपदे नावावर असलेल्या युक्रेनच्या क्लित्सच्कोचा हा २००४ नंतरचा पहिला पराभव आहे. ‘‘देवाचे आभार मानू इच्छितो. त्याच्या आशीर्वादामुळे हा विजय मला प्राप्त करता आला. मी या क्षणासाठी कठोर परिश्रम घेतले आणि माझे स्वप्न सत्यात उतरले,’’ असे मत फ्युरीने व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2015 2:18 am

Web Title: tyson fury beats wladimir klitschko to become world champion
Next Stories
1 गोलंदाजीच्या सदोष शैलीमुळे नरेनवर बंदी
2 शरीरसौष्ठव : ११ पदकांसह भारताला तिसरे स्थान
3 सांघिक विजेतेपद ही सर्वोत्तम गुरुदक्षिणा
Just Now!
X