News Flash

यू मुंबाकडून जयपूरचा धुव्वा

अत्राचलीने पकडींचे ६ गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली.

(संग्रहित छायाचित्र)

प्रो कबड्डी लीग

अभिषेक सिंगच्या झंझावाती चढाया आणि कर्णधार फझल अत्राचलीच्या अप्रतिम पकडींच्या जोरावर यू मुंबाने प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात शनिवारी जयपूर पिंक पँथर्सचा ४७-२१ असा धुव्वा उडवला.

यू मुंबाने आक्रमक सुरुवात करत ५-० अशी आघाडी घेतली होती. अभिषेकच्या सुरेख चढायांमुळे यू मुंबाने मध्यंतराला ही आघाडी २३-७ अशी नेत जवळपास आपला विजय निश्चित केला होता. जयपूरचा दीपक निवास हुडा, नीलेश साळुंखे हे सपेशल अपयशी ठरले. अभिषेकने अखेरच्या चढाईत चार गुण मिळवत सामन्यात एकूण १३ गुणांची कमाई केली. अत्राचलीने पकडींचे ६ गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात गुजरात फॉच्र्युनजायंट्सने अप्रतिम खेळ करत गतविजेत्या बेंगळूरु बुल्सला ३२-२३ अशी धूळ चारली. सचिनचे चढायांचे पाच गुण आणि पकडींमध्ये केलेल्या सांघिक कामगिरीमुळे गुजरातला हा विजय मिळवता आला.

आजचे सामने

यूपी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स

बेंगळूरु बुल्स वि. तमिळ थलायव्हाज

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 2:34 am

Web Title: u mumba jaipur pink panthers pro kabaddi akp 94
Next Stories
1 मँचेस्टर सिटीकडून ब्रायटनचा धुव्वा
2 ट्वेन्टी-२० मालिकेसाठी धोनीच्या निवडीची अपेक्षा नव्हतीच -गांगुली
3 Pro Kabaddi 7 : मोक्याच्या क्षणी गुजरातची बाजी, बंगळुरु बुल्सवर मात
Just Now!
X