30 September 2020

News Flash

U-19 World Cup : महत्वाच्या खेळाडूंमध्ये रंगणार द्वंद्व, हायवोल्टेज सामन्यावर सर्वांची नजर

भारतासमोर पाकिस्तानचं कडवं आव्हान

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत, क्रिकेटप्रेमींना नवीन वर्षात पहिल्यांदा…भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. आतापर्यंत अपराजित राहिलेल्या प्रियम गर्गच्या भारतीय संघासमोर रोहिल नाझीरच्या पाकिस्तानी संघाचं आव्हान असणार आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा इतिहास हा काहीसा पाकिस्तानच्या बाजुने आहे. मात्र गेल्या ३ स्पर्धांमध्ये भारतानेही पाकला पराभवाची धूळ चारली आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत दाखल झालेले आहेत. भारताकडून फलंदाजीत मुंबईकर यशस्वी जैस्वाल तर गोलंदाजीत रवी बिश्नोई-कार्तिक त्यागी जोडीने धडाकेबाज कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानकडून मोहम्मद हारिस आणि अब्बास आफ्रिदी हे खेळाडू सध्या फॉर्मात आहेत.

दोन्ही संघातील फॉर्मात असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर –

यशस्वी जैस्वाल – २०७ धावा दिव्यांश सक्सेना – ८९ धावा
डाव – ४ डाव – ३
सरासरी – १०३.५० सरासरी – ४४.५०
सर्वोत्तम धावसंख्या – ६२ सर्वोत्तम धावसंख्या – ५२*

 

अवश्य वाचा – U-19 World Cup : उपांत्य सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर, विजयाची संधी कोणाला??

मोहम्मद हारिस – ११० धावा मोहम्मद हुरायरा – ६४ धावा
डाव – २ डाव – १
सरासरी – ११० सरासरी – ६४
सर्वोत्तम धावसंख्या – ८१ सर्वोत्तम धावसंख्या – ६४

आता जाणून घेऊयात गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल…

अब्बास आफ्रिदी – ९ बळी मोहम्मद आमिर खान – ७ बळी
डाव – ४ डाव – २
सरासरी – १४.६६ सरासरी – १२.१७
सर्वोत्तम कामगिरी – ३/२० सर्वोत्तम कामगिरी – ४/३०

अवश्य वाचा –  U-19 World Cup Ind vs Pak : उपांत्य सामन्याआधी पाक सलामीवीराचं मोठं विधान, म्हणाला…

रवि बिश्नोई – ११ बळी कार्तिक त्यागी – ९ बळी
डाव – ४ डाव – ४
सरासरी – ९.५४ सरासरी – ९.७७
सर्वोत्तम कामगिरी – ४/५ सर्वोत्तम कामगिरी – ४/२४

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2020 2:40 pm

Web Title: u19 wc statistical preview get ready for another india pakistan world cup semi final psd 91
Next Stories
1 ICC T20I Ranking : राहुल-रोहित जोडीची क्रमवारीत मोठी झेप
2 U-19 World Cup : उपांत्य सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर, विजयाची संधी कोणाला??
3 संजय मांजरेकरांकडून विराट कोहलीची इम्रान खानशी तुलना
Just Now!
X