28 October 2020

News Flash

भारतीय युवा संघ विश्वचषकासह मायदेशी परतेल -रोहित

प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पुढील सामना शुक्रवारी न्यूझीलंडशी होणार आहे.

ऑकलंड : भारतीय युवा संघाने गतविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झोकात सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय युवा संघ विश्वचषकासह मायदेशी परतेल, अशी आशा भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केली.

गतविजेत्या भारताने पहिल्या दोन सामन्यांत श्रीलंका आणि जपानचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. ‘‘दक्षिण आफ्रिकेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाला माझ्याकडून शुभेच्छा. त्यांनी या स्पर्धेत चांगली सुरुवात केली असून विश्वचषक ते भारतात आणतील, अशी अपेक्षा आहे,’’ असे रोहित म्हणाला.

प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पुढील सामना शुक्रवारी न्यूझीलंडशी होणार आहे. भारताने चार वेळा युवा विश्वचषक उंचावला असून २०१८मध्ये भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली हे यश संपादन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 1:29 am

Web Title: u19 world cup 2020 rohit sharma express confident on indian u19 team to win world cup zws 70
Next Stories
1 भारत-न्यूझीलंड ‘अ’ क्रिकेट मालिका : भारत ‘अ’ संघाच्या विजयात पृथ्वी, सॅमसन यांची चमक
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईच्या सर्फराजचे झुंजार त्रिशतक
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची आसामवर मात
Just Now!
X