यूरो कपमधील ग्रुप एफच्या सामन्यात फ्रान्स आणि जर्मनीचा संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना म्युनिकमधील फुटबॉल एरिना स्टेडियमवर रात्री साडे बारा वाजल्यापासून खेळला जाईल. फ्रेंच संघ दोन वेळा यूरो कपचा विजेता आहे. १९८४ आणि २००मध्ये फ्रान्सने विजेतेपद जिंकले होते, तर जर्मनीने तीन वेळा यूरो कप जिंकला आहे. १९७२, १९८० आणि १९९६मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले आहे.

२०१६च्या यूरो कप उपांत्य सामन्यातही दोन्ही संघांचा सामना झाला होता. यात फ्रान्सने जर्मनीला २-० ने हरवून अंतिम फेरी गाठली. या सामन्यात फ्रान्सच्या अँटोईन ग्रिझ्मनने २ गोल केले. त्यामुळे जर्मन संघाला बदला घेण्याची संधी असेल. दोन्ही संघ प्रथमच एखाद्या प्रमुख टूर्नामेंटमध्ये (वर्ल्डकप / यूरो कप) गट साखळीत सामना खेळतील.

हेही वाचा – Video : मैदानाच्या मध्य भागातून मारला गोल, ठरला Euro कपच्या इतिहासातील सर्वात खास गोल

मोठ्या स्पर्धेत दोन्ही संघांचे समान रेकॉर्ड

मोठ्या स्पर्धांमध्ये फ्रान्स आणि जर्मनी ५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दोन्ही संघांची नोंद समान आहे. फ्रान्स आणि जर्मनीने प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत. तर, एक सामना बरोबरीत सुटला होता. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण ३१ सामने झाले आहेत. त्यापैकी जर्मनीने १० आणि फ्रान्सने १४ सामने जिंकले.

जर्मनीच्या होम ग्राऊंडवर फ्रान्स ठरलाय सरस

हा सामना जर्मनीच्या होम ग्राऊंडवर खेळला जाईल. फ्रान्सने म्युनिकमध्ये जर्मनीविरुद्धच्या शेवटच्या ५ सामन्यात विजय मिळवला आहे. या मैदानावर या दोघांमधील शेवटचा सामना सप्टेंबर २०१८मध्ये खेळला गेला. हा सामना ०-० असा बरोबरीत सुटला. जर्मनीने शेवटच्या ६ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत. तर फ्रान्सने त्यांच्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – बॅडमिंटन क्षेत्र हादरलं! बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूचा मृत्यू

फ्रान्सच्या प्रशिक्षकाला विक्रमाची संधी

यावर्षीच्या यूरो कपमध्ये फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिएर देसचॅ्म्प्सकडे अनोखा विक्रम निर्माण करण्याची संधी आहे. जर त्यांनी ट्रॉफी जिंकली, तर ते खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून अशी कामगिरी करणारे पहिले व्यक्ती ठरतील. त्याच वेळी, जर्मनीचे प्रशिक्षक जोआकिम लो यांची जर्मनीचे प्रशिक्षक म्हणूनची ही शेवटची स्पर्धा आहे. त्यानंतर तो निवृत्ती घेतील. त्याने यूरो कपमध्ये जर्मनीला १८ सामन्यांसाठी प्रशिक्षित केले आहेत, हा एक विक्रम आहे.