News Flash

UEFA Euro Cup स्पर्धेसाठी गुगलचं खास डुडल!

फुटबॉल चाहत्यांचा उत्साह बघून गुगलही मागे राहीलं नाही, गुगलने युरो कपच्या निमित्ताने खास डुडल तयार केलं आहे.

यूरो कप स्पर्धेसाठी गुगलने खास डुडल तयार केलं आहे. (सौजन्य- गुगल)

यूरो कप २०२० स्पर्धा आजपासून रंगणार आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण पुढाकार घेताना दिसत आहे. आपल्या संघाच्या जर्सी परिधान करून फोटो टाकण्यापासून दुसऱ्या संघावर चिखलफेक करण्यापर्यंत फुटबॉलप्रेमी सोशल मीडियाच्या मैदानात उतरले आहेत. फुटबॉल चाहत्यांचा उत्साह बघून गुगलही मागे राहीलं नाही, गुगलने युरो कपच्या निमित्ताने खास डुडल तयार केलं आहे. या डुडलमध्ये मैदान, फुटबॉल, सामनाधिकाऱ्याची शिटी आणि बॅकग्राउंडला इमारती दाखवल्या आहे. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना शुभेच्छा दिल्या आहेत. या डुडलला नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.

करोनामुळे यूरोपातील अकरा देशातील अकरा ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. करोनाचं संकट पाहता मर्यादीत फुटबॉलप्रेमींना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे डेन्मार्कने गुरुवारी मास्क बंधनकारक नसेल अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर २५ हजार प्रेक्षकांना कोपेनहेगन येथे होणारा सामना पाहण्याची परवनगी देण्यात आली आहे. बुडापेस्ट येथेच फक्त १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी असून म्युनिक येथे सर्वाधिक कमी म्हणजेच २२ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल.

UEFA Euro Cup 2020: करोनामुळे स्पर्धेच्या नियमात बदल

यूरो कपचं १२ जून २०२० ते १२ जुलै २०२० असं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. यंदा याच तारखेनुसार ठरलेल्या मांडणीने स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे बारा वाजता तुर्की आणि इटली यांच्यात सामना रंगणार आहे. रोम येथे होणाऱ्या ‘अ’ गटातील सलामीच्या सामन्यासाठी इटलीचे पारडे जड मानले जात आहे. रॉबेतरे मॅन्चिनी यांच्या मार्गदर्शनाखालील इटलीला २०१८च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयश आले. परंतु युरो चषकाच्या पात्रता फेरीत त्यांनी सर्वाधिक १० सामने जिंकून आपले इरादे स्पष्ट केले. गेल्या आठ लढतींत इटलीविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आलेला नाही. मार्को व्हेराटी, फेड्रिको चीसा, आंद्रे बेलोटी यांच्यावर इटलीची मदार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 11:38 am

Web Title: uefa euro cup 2020 google set doodle and wish to football team rmt 84
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 UEFA Euro Cup 2020: करोनामुळे स्पर्धेच्या नियमात बदल
2 UEFA Euro Cup फुटबॉलचा इतिहास; ६० वर्षात झाले इतके बदल
3 लढतीची पर्वणी! जोकोव्हिच वि. नदाल
Just Now!
X